मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे. याबाबत वनमंत्री संजय राठोड यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशात मंगळवारी पोहरादेवीच्या दर्शनासाठी गेलेले संजय राठोड 15 दिवसांनी सगळ्यांसमोर आले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी शक्तीप्रदर्शन केलं. संजय राठोड यांच्या कार्यकर्त्यांनी कोरोनाचे सर्व नियम डावलून लावले. यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी संजय राठोड यांच्यावर टीका केली आहे.
जर स्वच्छ चारित्र्याचे असतील तर ते लपले कशाला?, असा सवाल निलेश राणे यांनी संजय राठोडांना विचारला आहे. संजय राठोड यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि चौकशीला सामोरं जावं, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
या आधी जितेंद्र आव्हाडांनी इंजिनिअरला मारहाण केली होती. त्याबरोबर धनंजय मुंडे यांचं करूणा शर्मा प्रकरण सुद्धा दाबलं गेलं होतं .यावरून राज्यात महिला सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थीत होत आहे. जर महाविकास आघाडी सरकारचे मंत्रीच जर राजरोसपणे महिलांवर अत्याचार करायला लागले तर काय होणार?, असा सवाल निलेश राणेंनी केला आहे.
दरम्यान, संजय राठोड यांना पोहरादेवी इथलं शक्तिप्रदर्शन भोवण्याची शक्यता आहे. राठोड यांनी गर्दी जमवून केलेल्या शक्ती प्रदर्शनाबाबत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केल्याचं कळतंय. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पोहरादेवी इथल्या शक्तीप्रदर्शन प्रकरणी लगेचच कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
थोडक्यात बातम्या –
आंतरजातीय लग्नाबद्दल हायकोर्टाने दिला ‘हा’ ऐतिहासिक निकाल!
“संजय राठोडांची अवस्था ‘सामना’मधल्या भेदरलेल्या सरपंचासारखी”
‘4 नाही, तर 40 लाख ट्रॅक्टर घेऊन तयार राहा’; राकेश टिकैत आक्रमक
“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”
Comments are closed.