“…असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही”
मुंबई | राज्यसभेच्या निवडणुकीसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. यामुळे शिवसेनेकडून आपल्या आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे.
सुरुवातीला शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील विधानभवनानजीकच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र तिथे भाजप आमदारांचाही मुक्काम असल्याची माहिती कळताच शिवसेनेने हे हॉटेल बदलले
सर्व आमदारांना मार्वे बीच येथील रिट्रीट हॉटेलवर ठेवण्यात आले आहे. रिट्रीट हॉटेलमध्ये सर्व आमदारांच्या सुरक्षेसाठी शिवसेनेची विविध पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या पक्षाचा एकही आमदार फुटू नये यासाठी त्यांच्यावर करडी नजर ठेवली जात आहे. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं आहे.
स्वतःच्याच आमदारांवर इतका अविश्वास दाखवणारा महाराष्ट्राचा पहिलाच मुख्यमंत्री असेल. निवडणुका येतील आणि जातील पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही. ज्या मुख्यमंत्र्याचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही ते सरकार कसं चालत असेल हे वेगळे सांगायची गरज नाही, अशी टीका निलेश राणेंनी केली आहे.
थोडक्यात बातम्या-
मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय, वाचा एका क्लिकवर
“…म्हणून ते गोपीचंद पडळकर सारखा विकृत व्यक्ती पवारांच्या अंगावर सोडतात”
वाढत्या कोरोना रूग्णांमुळे आषाढी वारीवर निर्बंध येणार का?; आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणतात…
शिवसेना आमदाराचा मंत्र्यांवर अत्यंत गंभीर आरोप, राजकीय वर्तुळात खळबळ
नोटांवरील महात्मा गांधींचा फोटो बदलला जाणार का?; आरबीआयने स्पष्टचं सांगितल
Comments are closed.