बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, जे जे त्यांच्या नादी लागले ते…”

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई (नॅशनल स्टॉक एक्स्चेंज) मधील कर्मचाऱ्यांच्या कथित फोन टॅपिंग प्रकरणाशी निगडीत मनी लॉड्रिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे

5 जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने संजय पांडेंना सर्वप्रथम बोलावलं होतं, त्यानंतर चौकशीअंती ईडीने पांडेंना अटक केली. यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे महाराष्ट्रासाठी पनवती होते, अशी बोचरी टीका निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

मुंबईचे माजी पोलीस कमिशनर संजय पांडेंसारखे जे उद्धव ठाकरे सरकारच्या नादाला लागले ते सगळे देशोधडीला लागले,” असं ट्वीट निलेश राणेंनी केलंय.

थोडक्यात बातम्या- 

उद्धव ठाकरेंचा आणखी एक निर्णय एकनाथ शिंदेंकडून मागे, आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

तसाच पाऊस आणि पडत्या पावसात तशीच सभा, शरद पवारांप्रमाणे आदित्य ठाकरेही लोकांची मनं जिंकणार?

चित्रा वाघ यांनी टाकलेल्या हॉटेलमधील ‘त्या’ व्हिडीओवरून नाना पटोले भडकले, दिला ‘हा’ गंभीर इशारा

राष्ट्रपती निवडणुकीचा आज निकाल, द्रौपदी मुर्मू 15 वर्षांपूर्वीप्रमाणे इतिहास रचणार?

शरद पवारांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे विभाग आणि सेल बरखास्त

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More