मुंबई | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. याप्रकरणावरून भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतंय, असा आरोप निलेश राणेंनी सरकारवर कला आहे. निलेश राणेंनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे.
सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतो, कॅबिनेट मिटिंगमध्ये बसतो, पण तरीही राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. तसेच परत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी कधीही स्वत:च्या भाषणात मी मर्द आहे असं म्हणू नये, अशी बोचरी टीका देखील निलेश राणेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणात चित्रा वाघ या वानवडी पोलीस स्टेशनला जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या, पोलिसांनी त्यांना दिलेली वागणूक बघून आश्चर्य वाटले, एक गुन्हेगार मंत्र्याला वाचवण्यासाठी पोलीस किती तत्पर आहेत. यावरून लक्षात आलं अशा शब्दात निलेश राणेंनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
ठाकरे सरकार संजय राठोडला वाचवतय. सगळ्या बाजूने अडकलेला संजय राठोड शक्तिप्रदर्शन करतो, कॅबिनेट मीटिंगमध्ये बसतो पण तरीही त्याचा राजीनामा घेण्याची हिंमत आणि धाडस मुख्यमंत्र्यामध्ये नाही… परत मुख्यमंत्र्यानी कधीही स्वतःच्या भाषणात म्हणू नये की ‘मी मर्द आहे‘
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) February 25, 2021
थोडक्यात बातम्या-
मोदी आता सरदार पटेल यांच्यापेक्षाही मोठे वाटू लागले आहेत- संजय राऊत
…म्हणून हृतिक रोशनने 75 कोटींची ती ऑफर धुडकावली!
‘धकधक गर्ल’ माधुरी दिक्षीतने शेअर केले ग्लॅमरस फोटो; फोटो पाहून चाहते झाले फिदा
तृप्ती देसाई यांचे संजय राठोड यांना खुले पत्र, वाचा जसेच्या तसे
‘PI लगडला चालवणारा बाप कोण ते आम्ही शोधून काढू’; चित्रा वाघ आक्रमक
Comments are closed.