बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडून टाका सांगितलं होतं, खुर्चीसाठी तुम्ही त्यांचे विचारच गाडून टाकले ”

मुंबई | खुर्ची हे माझं स्वप्न नव्हतं, पण काळ कठीण आहे. पुत्रकर्तव्य म्हणून मी खुर्चीवर आहे. बाळासाहेबांना हातात हात देऊन वचन दिलं होतं, तुमचा शिवसैनिक मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवेन, मात्र अजून माझं वचन पूर्ण झालेलं नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटलं. यावरून भाजप नेते निलेेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. काय नाटक आहे? कसलं कर्तव्य आणि कसलं काय, असं म्हणत निलेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

काय नाटक आहे. प्रॉपर्टीसाठी भाऊ कोर्टात आहे. कसलं कर्तव्य आणि कसलं काय. बाळासाहेबांनी सांगितलं होतं की काँग्रेसला कायमचा गाडून टाका. उद्धव ठाकरेंनी खुर्चीसाठी स्व. बाळासाहेब ठाकरेंचे विचारच गाडून टाकले, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं आहे.

दरम्यान, मी जबाबदारी घेतली, मी माझ्यासाठी काही करत नाही, मला मुख्यमंत्रिपदाची अभिलाषा नव्हती. खुर्ची हे वैभव आहे, देवाची दया आहे, अनेकांचं स्वप्न या खुर्चीचं होतं. त्यामुळे माझी खुर्ची खेचाल, तुम्ही बसा. पण खुर्चीचा मुद्दा काय आहे तर काम करा, माझ्यापेक्षा दुसरा काम करत असेल तर बरं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

 

थोडक्यात बातम्या- 

‘दररोज सामन्यापुर्वी…’; सिक्सर किंग युवराजने दिला भारतीय संघाला मोलाचा सल्ला

‘बिल्डरने वेळेवर घर दिलं नाही तर…’; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

इतर राज्यांनी महाराष्ट्र माॅडलचं अनुकरण करावं; उद्योगपतींकडून मुख्यमंत्र्याचं कौतुक

“ट्विटर मोदींच्या राजकीय प्रचाराचा आत्मा होता, पण आता…”

“नैतिकता विकणाऱ्यांनी नैतिकतेवर बोललं की, लोक चंपा म्हणतात”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More