बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही”

मुंबई | तब्बल 300 कोटींचा मालक 5 ते 6 कोटींसाठी आईबरोबर आत्महत्या करतो, हे मला पटत नाही, यात काही वेगळंही कारण असू शकतं आणि त्याची उत्तरं महाराष्ट्राला मिळायला हवीत, असं भाजप नेते निलेश राणे यांनी म्हटलं आहे.

मुंबईतील प्रसिद्ध इंटिरिअर डिझायनर अन्वय नाईक यांनी आत्महत्या का केली?, याचं सत्य नक्की बाहेर पडेल, असं निलेश राणे म्हणालेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

अन्वय नाईक आणि त्यांच्या मातोश्री या दोघांनीच का आत्महत्या केली हे पटत नव्हतं. म्हणून अलिबागमध्ये स्थानिकांकडून माहिती काढल्यानंतर असं कळलं की त्यांची परिस्थिती इतकी वाईट नव्हती. त्यांनी आत्महत्या केली त्याचं कारण पैसे होऊ शकत नाही, असं अलिबागमधील काही लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेलंच, असं निलेश राणे यांनी म्हटलंय.

दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी काल अर्णव गोस्वामीला अटक केल्यानंतर त्याला मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर करण्यात आले होते. यावेळी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

महत्वाच्या बातम्या-

…त्यामुळे इंडस्ट्रीला आलेले अश्रू सरकार म्हणून आम्ही पुसणार- उद्धव ठाकरे

“किंचाळणाऱ्या बोक्याला पिंजऱ्यात टाकून उद्धव ठाकरेंनी वडिलांसारखी हिंमत दाखवली”

“…तर भाजपने मानवता, न्याय, सत्य या शब्दांचा वापर यापुढे कधीही करू नये”

अर्णब प्रकरणी दिल्लीतील सत्य मांडलं तर पळता भुई थोडी होईल- संजय राऊत

“बीसीसीआयला दाखवण्यासाठीच रोहित शर्मा सामना खेळला”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More