’50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमावलं’; निलेश राणेंचा पवारांना टोला
मुंबई | एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रात सुरु असलेल्या धुमश्चक्रीत आता नवे वाद निर्माण होण्याची शक्यात आहे. सर्वच स्तरातून यावर चर्चा सुरु असून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरु झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थान सोडलं. एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिवसेंदिवस शिवसेनेचे आमदार जाऊन मिळत आहेत. यामुळे उद्धव ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढत आहेत.
महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेते टिकास्त्र सोडत आहेत. भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार प्रणेते शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लक्ष्य केलं आहे. 50 आमदार आणि मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले आहेत कारण त्यांना काॅंग्रेस आणि पवार साहेब नको. 50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमावलं, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
निलेश राणे हे गेले दोन दिवस सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर टीका करत आहेत. शिवसेनेचे 11/12 आमदार शिवसेने सोबत राहतील अशी परिस्थीती आहे, पक्ष चालवणं उद्धव ठाकरेंचं काम नाही. हे 11/12 घेऊन आयपीएल टीमसाठी तयारी करा… मातोश्री 11 बनवा. त्यापुर्वी “दुसऱ्यांची घरं पाडणार्या व्यक्तीला आज नियतीने घर सोडायला लावलं, असं देखील ट्विट केलं होतं.
सध्या शिवसेनेच्या एकूण आमदारांपैकी दोन तृतीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. ते भाजपशी युती करुन सरकार स्थापन करणार की, पुन्हा घरवापसी करणार? यावर सगळ्यांची नजर आहे.
50 आमदार/मंत्री मूळ घर सोडून वेगळे झाले कारण त्यांना काँग्रेस आणि पवार साहेब नको.
50 वर्षाच्या राजकारणात पवार साहेबांनी हे कमवलं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 23, 2022
थोडक्यात बातम्या-
‘…असल्या धमक्यांना भीक घालत नाही’, एकनाथ शिंदेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
‘…तर घर गाठणं कठिण होईल’, नारायण राणेंचा शरद पवारांना थेट इशारा
महिन्याभरानंतर केतकी चितळेची तुरूंगातून सुटका, बाहेर येताच म्हणाली…
खरंच चार्टर्ड प्लेनने आला होतात का?, ‘त्या’ फोटोंवर नितीन देशमुखांची प्रतिक्रिया
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीवरून अजित पवारांचं भाजपला क्लिनचीट, म्हणाले…
Comments are closed.