“शरद पवारांमध्ये बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचं टॅलेंट आहे”
मुंबई | भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं आहे. या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचं टॅलेंट आहे, अशी टीका निलेश राणेंनी शरद पवारांवर केली आहे.
शरद पवारांनी राज्यसभा निकालावर प्रतिक्रिया देताना भाजपच्या गटात असे अनेक लोक आहेत की, ज्यांच्यासोबत मी कधीकाळी काम केलं आहे. मी एखादा शब्द टाकला तर नाही बोलायची त्यांची तयारी नसते. पण मी त्यात पडलो नाही, असं पवार म्हणाले. यावरून निलेश राणेंनी पवारांवर बोचरी टीका केलीये.
निलेश राणेंनी यासंदर्भा एक ट्विट केलं आहे. या माणसात बिघडवण्याचं आणि जागेवर पलटी मारायचे टॅलेंट आहे, मतांचा कोटा पवारसाहेबांनीच वाढवला आणि आता म्हणतात मी त्यात पडलो नाही, असं निलेश राणेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, आज उद्धव ठाकरेंना कळलं असेल स्व. बाळासाहेब पवार साहेबांबद्दल किती अचूक बोलायचे आणि समजायचे, असंही निलेश राणे म्हणालेत.
थोडक्यात बातम्या-
‘देवेंद्र फडणवीसांनी चमत्कार केला’; शरद पवार यांच्याकडून फडणवीसांचं कौतुक
“निवडणूक केवळ लढवण्यासाठी नाही, तर जिंकण्यासाठी लढवली होती”
“मला टार्गेट का केलं जातंय याबद्दल काहीच माहीत नाही”
RajyaSabha Election Result | देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला सर्वात मोठा धक्का!
“चंद्रकांत पाटलांनी हिमालयात जाऊन डोक्याला तेल लावावं”
Comments are closed.