बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तरुण अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो”

मुंबई |  तरुण अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो, असं वक्तव्य अभिनेत्री नीना गुप्ता यांनी केलं आहे. नीनी गुप्ता यांनी ‘बधाई हो’, ‘मुल्क’ यांसारख्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. त्या एका मुलाखतीमध्ये बोलत होत्या.

मला ज्या प्रकारच्या भूमिका सध्या मिळत आहेत, त्याने मी खूश आहे. मला असं वाटतं की जीवनात मला एक नवी वाट मिळत आहे. काम मिळत असल्यामुळे उत्साहपूर्ण आणि खूश असल्याची भावना मनात कायम असते. मात्र याचसोबत मी उदास आहे, असं नीना गुप्ता यांनी म्हटलं आहे.

मी तरुण असते तर बरं झालं असतं असं मला वाटतं. तरुण अभिनेत्रींना पाहून माझा जळफळाट होतो. खासकरुन ज्या अभिनेत्री खूप चांगलं काम करत आहेत, असं नीना गुप्ता यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, ‘बधाई हो’मधील त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं. हाच चित्रपट टर्निंग पॉईंट ठरल्याचं नीना गुप्ता यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More