नीरज चोप्राला झालाय ‘हा’ गंभीर आजार; प्रकृतीबद्दल मोठी अपडेट समोर

Neeraj Chopra | पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेत भालाफेकमध्ये भारताला रौप्य पदक जिंकवून देणारा स्टार खेळाडू नीरज चोप्रा याच्याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. नीरज चोप्राच्या प्रकृतीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. नीरज सध्या एका मोठ्या आजाराचा सामना करत आहे. उपचारासाठी तो (Neeraj Chopra) परदेशी रवाना झाला आहे.

नीरज चोप्रा एका गंभीर आजाराने त्रस्त असल्याचं समोर आले आहे. पण स्पर्धेत खेळत असताना त्याने कुठेही आजारी असल्याचं जाणवू दिले नाही. नीरज चोप्रा हा इनग्विनल हर्निया या गंभीर आजाराने त्रस्त आहे. त्याच्यावर लवकरच शस्त्रक्रिया केली जाणार आहे.

यासाठी नीरज हा जर्मनीला गेला आहे. गेल्या दोन वर्षांपासून नीरज या आजारामुळे त्रस्त आहे. आता त्याला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले आहे. त्यामुळे नीरज सध्या परदेशात उपचार घेण्यासाठी गेला आहे.

इनग्विनल हर्निया म्हणजे काय?

या आजाराला ग्रोइन हर्निया असं देखील म्हणतात. हा आजार किंवा रोग नसून पुरुषांमध्ये उद्भवणारी समस्या आहे. जी 100 पुरुषांपैकी 25 टक्के पुरुषांमध्ये होऊ शकते. यामध्ये ओटीपोटात किंवा ओटीपोटाच्या स्नायूंमध्ये कमकुवतपणामुळे हर्निया होऊ शकतो, जो त्वचेखाली मऊ फुगवटा असतो. यामध्ये जर तो कंबरेमध्ये आढळला तर त्याला इनग्विनल हर्निया म्हणतात. (Neeraj Chopra)

या आजाराची लक्षणे काय?

यामध्ये मांडीचा सांधा भागामध्ये फुगवटा तयार होतो. तसेच कंबरेमध्ये दबाव येतो. खोकताना किंवा वाकताना पाठदुखी जाणवते. तसेच दीर्घकाळापर्यंत खोकला आणि कोरडे घसा याचा त्रास होतो. लघवी करताना किंवा शौचास त्रास होणे, अशी लक्षणे दिसून येतात. (Neeraj Chopra)

वारंवार कठोर व्यायाम किंवा शारीरिक श्रम , पोटाच्या शस्त्रक्रियेनंतर कमकुवत पोट, तासनतास उभे राहणे, तीव्र लठ्ठपणा यामुळे हा आजार होण्याची शक्यता असते. ही समस्या मुख्यतः पुरुषांमध्ये दिसून येते.

News Title :  Neeraj Chopra Health Update

महत्वाच्या बातम्या-

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी; पगार ऐकून थक्क व्हाल, लगेच करा अर्ज

आता बँकेत जाण्याची गरज संपली; SBI बँकेने ग्राहकांना दिली गुड न्यूज

LIC ची डिजी टर्म इन्शुरन्स योजना काय आहे? जाणून घ्या फायदे व पात्रता

स्टँडअप कॉमेडियन शो मधलं ‘ते’ वक्तव्य अन् आज मुनव्वरचा माफीनामा!

..अन् अमिताभ बच्चन यांनी थेट हाथच जोडले; नेमकं असं काय घडलं?