बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“तुम्हाला मेहनतीचा जेव्हा थकवा येत नाही तेव्हा समजून जा तुम्ही इतिहास रचणार आहात”

मुंबई | भारताला ऑलिम्पिकमध्ये आज सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्राने इतिहास रचला आहे. सर्व देशभरात त्याच्या कामगिरीचं कौतुक होताना दिसत आहे. नीरजने भालापेकमध्ये विक्रमी भाला फेकला आहेे. त्याच्या या यशाच्या पाठीमागे कठोर मेहनत आहे. कोणतंही ध्येय गाठताना जिद्द आणि चिकाटी किती महत्त्वाची आहे हे नीरजने दाखवलं आहे.

नीरजने 2017 साली एक ट्विट केलं होतं त्याचं ते ट्विट व्हायरल झालं आहे. त्या ट्विटमध्ये त्याने असं म्हटलं आहे की, जेव्हा जिंकण्याची इच्छा तुम्हाला झोपू देत नाही, जेव्हा मेहनतीशिवाय तुम्हाला काहीचं चांगलं वाटत नाही. तुम्हाला सतत मेहनत करूनही थकवा येत नाही तेव्हा समजून जा तुम्ही इतिहास रचणार आहात.

या ट्विटमधील ओळींप्रमाणे नीरजने आपलं स्वप्न सत्यात उतरवलं आहे. नीरजने घेतलेली मेहनत त्याच्या आजच्या यशाचा पुरावा आहे. नीरजला हरियाणा सरकारकडून 6 कोटी रूपयांचं बक्षीस मिळालं आहे.

दरम्यान, नीरज चोप्राचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतुक केलं आहे. टोकियोत भारताने इतिहास रचला. नीरज चोप्राने संस्मरणीय असा खेळ केला. युवा नीरजने अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. नीरजच्या संयमाचं, धैर्याचं आणि अतुलनीय प्रदर्शनाचं कौतुक, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

देशात 4 लाख 12 हजार123 सक्रीय रूग्ण तर…; वाचा ताजी आकडेवारी

…अन् तिचं स्वप्न अधूरंच राहिलं; राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूला विकावं लागतंय पार्किंग तिकीट!

जेवढ्या गाई तेवढचं तूप विकतो, आम्ही रामदेव बाबांसारखं करत नाही- विजय वडेट्टीवार

आनंद महिद्रांनी नीरज चोप्राची केली बाहुबलीशी तुलना; म्हणाले….

फडणवीसांकडून युतीच्या चर्चेला पूर्णविराम! म्हणाले, 2024 ला आम्ही…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More