बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरज चोप्राची धडाकेबाज कामगिरी; भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये एन्ट्री

टोकियो | गेल्या काही दिवसांपासून जपानच्या टोकियो शहरात ऑलिम्पिक स्पर्धेला सुरूवात झाली आहे. या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडू जीवाचं रान करून खेळत आहेत. परंतु भारताच्या पदरी निराशाच पडलेली दिसून येतीये. भारताच्या खात्यात आतापर्यंत केवळ दोनच पदकं पडली आहे. त्यातच आता भालाफेक स्पर्धेत भारताच्या आशा उंचावल्या आहेत.

ऑलिम्पिकमध्ये भारताची सुरूवात चांगली झाली. भालाफेक स्पर्धेत भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने धडाकेबाज कामगिरी केली आहे. आज सकाळी भालाफेकीचा सामना सुरू झाला. फायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी ही स्पर्धा सुरू होती. क्वालिफाइंग राऊंडमधून फायनल गाठण्यासाठी नीरजला 83.5 मीटरचं टार्गेट देण्यात आलं होतं. पण त्याने 86.65 मीटरवर भाला फेकून दाखवला.

क्वालिफाइंग राऊंडमध्येच नीरजने आपल्या महत्वकांक्षा स्पष्ट केल्या आहेत. क्वालिफाइंग राऊंडमधून ग्रुप ए मध्ये नीरजने अव्वल स्थान गाठलं आहे. त्याचबरोबर त्याने फायनलमध्ये दमदार एन्ट्री देखील मारली आहे. नीरजसोबतच भारताचा आणखी एक भालाफेकपट्टू शिवपाल यादव याच्याकडून देखील भारताला पदकाची अपेक्षा आहे.

दरम्यान, नीरजचा अंतिम सामना 7 ऑगस्ट रोजी होणार आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्राने स्वतःचाच विक्रम मोडीत काढत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक पटकावलं होतं. त्यासोबतच आशियाई स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला.

थोडक्यात बातम्या-

पुण्याला झिका व्हायरसचा धोका?; केंद्रीय पथक तातडीने पुण्यात दाखल

पुणे-सातारा महामार्गावर शिरवळजवळ विचित्र अपघात, ट्रकची 6 वाहनांना धडक!

भाजपच्या ‘या’ माजी आमदाराला मोठा धक्का! पत्नीच्या शैक्षणिक संस्थेला कोट्यवधींचा दंड

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

शिवसेनेला मोठा धक्का! तीन वेळा आमदार आणि माजी राज्यमंत्री राहिलेल्या ‘या’ नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More