बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नीरज मराठाच, त्याच्या घरी मी जाऊन आलोय- खासदार संभाजीराजे

मुंबई | टोकियो ऑलिम्पिक 2021 मध्ये भारताला एकमेव सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राचं देशभरातून कौतुक होत आहे. मात्र त्याची कामगिरी राहिली बाजुला पण चर्चा आहे ती नीरज चोप्राच्या जातीबाबत. नीरज चोप्रा मराठा असल्याचं सोशल माध्यमांवर काही ग्राफीक्स व्हायरल झाली होते. अशातच यावर भाजपचे खासदार संभाजीराजे यांनीही यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकून देणाऱ्या नीरजच्या घरी मी जाऊन आलो आहे. नीरज हा मराठाच असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं आहे. पुण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी आता मराठा आंदोलनाबाबत भाष्य केलं आणि नाशिक आणि कोल्हापूरनंतर आता नांदेडमध्ये मूक आंदोलन करण्याबाबत माहिती दिली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळवायचं असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन लढा द्यायला हवा. त्यासाठी आपापसातील मतभेद विसरायला हवेत. सरकारचं काही चुकलं तर बोलावं, नसेल तर त्यावर कौतुक करायला पाहिजे. मराठा समाजाने सांगितलं तर आझाद मैदानावरही बेमुदत लाक्षणिक उपोषण करणार असल्याची भूमिका संभाजी राजे यांनी घेतली आहे.

दरम्यान, न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द करताना असं म्हटलं होतं की, मराठा समाज फारवर्ड, डोमीनेट वर्ग आहे. यासाठी आपल्याला केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे जावं लागेल. त्यासाठी शेवटचा 2007 चा कालेलकर अहवाल यासाठी लागू होत असल्याचं संभाजी राजे भोसले यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

ईडीचा अविनाश भोसलेंना दणका, केली ‘ही’ मोठी कारवाई!

भाजप असं आडवं पडलं आहे की आम्ही इथून उठणारच नाही- संजय राऊत

2014 पासून देशाला ग्रहण लागलं- नाना पटोले

“आम्ही दगडूशेठ समोर गाऱ्हाणं मांडलं म्हणून पुण्यातील निर्बंध शिथील झाले”

आदित्य ठाकरेंचा रावसाहेब दानवेंना टोला, म्हणाले ‘आधीचे रेल्वे मंत्री…’

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More