बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

निष्काळजीपणा जीवावर बेतला, कोरोना टेस्ट करताना किट घशात अडकल्याने महिलेचा मृत्यू

पाटणा | कोरोना काळात अनेकांनी आपला जीव गमावलं आहे. तर अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं. यावेळी अनेकांचा बळी केवळ निष्काळजीपणामुळे गेला आहे. अशातच बिहारमधील एका घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. कोरोना चाचणी करायला गेलेल्या एका महिलेचा निष्काळजीपणामुळे मृत्यू झालाय.

मृत झालेल्या महिलेचं नाव जासो देवी असं आहे. त्यांचं वय 65 वर्ष होतं. बिहारमधील पाटना येथे जासो या कोरोना चाचणी करण्यासाठी केंद्रावर गेल्या होत्या. कोरोनाची चाचणी करत असताना अचानक कीटमधील दांडी त्यांच्या गळ्यात गेली. गळ्यात दांडी अडकल्याच्या अर्ध्या तासानंतर जासो यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.

अर्धा तास जासो यांच्या गळ्यात अडकडलेली दांडी काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र दांडी बाहेर आली नाही. त्यानंतर जासो यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्या बेशुद्ध झाल्या. यादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र केंद्रावरील डाॅ. कमलेश यांनी महिलेचा मृत्यू टेस्ट करताना झाला असल्याला नकार दिला आहे.

दरम्यान, देशभर कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून काही प्रमाणात रुग्ण संख्येत घट होत आहे. मात्र अशातच अनेकदा डाॅक्टरांचा तसेच नर्सचा देखील निष्काळजीपणा नडतो आणि रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो.

थोडक्यात बातम्या-

पोस्ट ऑफिसच्या ‘या’ चार योजना तुम्हाला बनवू शकतात करोडपती, आजच पैसे गुंतवा

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या तोंडावर एमआयएमला मोठा झटका!

टोस्ट आवडीने खात असाल तर हा व्हिडीओ एकदा पाहाच!

“आमदार प्रणिती शिंदे लवकरच कॅबीनेट मंत्री होणार”

…म्हणून मी म्हणालो माजी मंत्री म्हणू नका- चंद्रकांत पाटील

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More