पुणे | कोरोना (Corona) महामारीनं जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. कोरोनाच्या नवनवीन व्हेरियंटनं तर कहरच केला आहे. कोरोनाचा हा वाढता संसर्ग पाहता प्रशानसनानंही कडक कारवाई करायला सुरुवात केली आहे.
वाढत्या संसर्गामुळे अनेक ठिकाणी निर्बंध कडक करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांना निर्बंध पाळण्यात सक्ती केली जात आहे. अशातच पुणेकरांचा हलगर्जीपणा पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांकडून दंडात्मक कारवाईही केली जात आहे.
मास्क वापऱ्यावर सक्ती केली असताना पुणेकरांनी मास्क वापऱ्यात हलगर्जीपणा केल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे पोलिसांनी याविषयी दंडात्मक कारवाई सुरु केली आहे. गेल्या दहा दिवसांत विनामास्क फिरणाऱ्या 7 हजार 775 नागरिकांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून 33 लाख 2 हजार 100 रुपयांचा दंड वसूल केला आहे.
दरम्यान, महापालिकेनं आणि पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा पुकारला आहे. त्यामुळे आता बेफिकर नागरिकांच्या हलकर्जीपणा आटोक्यात येणार आहे.
थोडक्यात बातम्या –
चिंताजनक! कोरोना रुग्णसंख्येत वाढ, ‘या’ जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण
धक्कादायक! ‘इतक्या’ वेळा होऊ शकते ओमिक्राॅनची लागण
सेल्फ टेस्टिंगसाठी मुंबई पालिकेचा महत्त्वाचा निर्णय, वाचा नवी नियमावली
“मराठी भाषेवर इतकं प्रेम आहे तर सरकारनेच दुकानांच्या सर्व पाट्या बदला”
‘प्रश्न विचारणं सोपं असतं, त्याला काही अकलेची गरज नसते’; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला
Comments are closed.