बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेहा कक्कर गरोदर?; एअरपोर्टवरील लूक पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

मुंबई | प्रसिद्ध गायक नेहा कक्कर नुकतीच विमानतळावर स्पाॅट झाली आहे. सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भैयानीने त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवर नेहाचा हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळी नेहाचा लुक पाहून अनेक चाहते कोड्यात पडले असून नेहा गर्भवती असल्याची चर्चा सर्वत्र रंगली आहे.

नेहाने काही दिवसांपुर्वीच आपल्या कामापासून ब्रेक घेतला आहे. यानंतर ती आपल्या पतीसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करत असल्याने चाहते ती गरोदर असल्याचं म्हणत आहेत. अशातच विरल भैयानीने शेअर केलेल्या व्हिडीओवर देखील अनेकांनी हा प्रश्न विचारला आहे. यावेळी नेहाने एक लुज टि-शर्ट आणि जाॅगर घातला परिधान केला आहे.

काही दिवसांपूर्वी नेहाने स्वत:चा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं की तिला आधीसारखे व्हावे, असं वाटत आहे. नेहाने लिहिलं की, ‘मला पुन्हा असे दिसावेसे वाटते, मला माहित आहे की माझे 1 किलो वजन कमी झाले आहे. मात्र, अद्याप 5 किलो कमी करणे बाकी आहे.’

दरम्यान, नेहाची फॅन फॉलोव्हिंग एखाद्या मोठ्या स्टारपेक्षा कमी नाही. ती भारतातील सर्वात जास्त फॉलोअर्स असणारी पहिली गायिका आहे. इतकेच नव्हे तर, नेहाने अलीकडेच दीपिका पदुकोण आणि आलिया भट्ट यांनाही मागे टाकलं आहे.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

थोडक्यात बातम्या-

मंत्री छगन भुजबळ यांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये एक तास चर्चा

‘…अन्यथा आमचा लढा आम्ही पुन्हा सुरू करू’; खासदार संभाजीराजेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा

वाढदिवसाच्या दिवशीच माजी आमदार मधुकर ठाकूर यांचं निधन!

‘खासगी कामासाठी सरकारी विमानाने प्रवास का केला?’; न्यायालयाने उर्जामंत्र्यांकडे मागितलं उत्तर

“एक मुलगा अभ्यास करायचा नाही, पण नंबर वन यायचा, मुख्यमंत्र्यांचं तसंच आहे”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More