Nepal Bus Accident | नेपाळमधील बस दुर्घटनेत महाराष्ट्रातील 27 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस एका नदीपात्रात कोसळली. यामध्ये आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 16 पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. नेपाळमध्ये झालेल्या या अपघातात जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रहिवाशांचा समावेश आहे. (Nepal Bus Accident)
या घटनेनंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणी शोक व्यक्त केलाय. या अपघातातील मृतदेह वायुसेनेच्या विमानाने महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. मृत्यू झालेल्यांचे मृतदेह तातडीने महाराष्ट्रात आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय वरीष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला.
महाराष्ट्राच्या जळगाव जिल्ह्यातील प्रवासी यात्रेकरूंच्या बसला उत्तर प्रदेशातून नेपाळकडे जाताना झालेल्या अपघाताचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. या दुर्दैवी अपघातात काही भाविकांचा मृत्यू झाला असून काही भाविक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे. नेपाळ दूतावास व उत्तर प्रदेश सरकारच्या…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) August 23, 2024
16 मृतांची ओळख पटली
आज (24 ऑगस्ट) दुर्घटनेमधील मृतदेह नेपाळवरून उत्तर प्रदेशातील गोरखपुर येथे आणण्यात येतील. तेथून वायुसेनेच्या विमानाने नाशिक येथे ते आणले जातील. त्यानंतर कुटुंबियांकडे मृतदेह सोपविण्यात येणार आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगावमधील 27 मृतांपैकी 16 जणांची ओळख पटली आहे. यामध्ये काही बालकांचा देखील समावेश आहे. या दुर्घटनेनंतर नेपाळमधील जवानांच्या मदत पथकाने तातडीने मदतकार्य सुरु केले. यातील काही भाविकांना वाचविण्यात यश मिळाले. तर, काही भाविक बेपत्ता आहेत. (Nepal Bus Accident)
अपघात नेमका कसा घडला?
मिळालेल्या माहितीनुसार, बेळी (ता. जळगाव) येथील कुंडलेश्वर संस्थानच्या वतीने अयोध्या येथे रामकथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कथेसाठी जळगाव तसेच इतर ठिकाणांहून जवळपास 1500 भाविक अयोध्येला गेले होते. सप्ताहाची सांगता झाल्यानंतर वरणगाव, पिंपळगाव, गोळेगाव, तळवेल, आचेगाव आणि भुसावळ येथील काही भाविक नेपाळकडे देवदर्शनासाठी दोन बसमधून रवाना झाले होते. मात्र, काळाने मध्येच घात केला. त्यापैकी एक बस दरीत कोसळली.(Nepal Bus Accident)
या घटनेप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त केला. अपघातात भाविकांच्या मृत्यूमुळे दु:ख झाले असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना, अशा शब्दांत माेदी यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.
News Title – Nepal Bus Accident
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी!’गब्बर’चा क्रिकेटला अलविदा; शिखर धवनकडून निवृत्ती जाहीर
आज महाराष्ट्र बंद आहे की नाही?, कोर्टाच्या मनाईनंतर मविआने घेतला मोठा निर्णय
आज श्रावणी शनिवार, महादेवाच्या कृपेने ‘या’ राशींचं भाग्य उजळणार!
देवेंद्र फडणवीसांनी महिलांना दिली मोठी गुड न्यूज!
भाजपला मोठा धक्का बसणार; ‘या’ नेत्याने प्रोफाईलवरून हटवलं कमळ