नेपाळ घेणार चीनी इंटरनेट सेवा; भारताच्या वर्चस्वाला धक्का

नवी दिल्ली | भारताचं शेजारी राष्ट्र असलेल्या नेपाळनं आता चीनी इंटरनेट सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या भागातील भारताच्या एकाधिकारशाहीला धक्का बसणार आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीला नेपाळमध्ये चीनी इंटरनेट सेवा सुरू होईल, अशी माहिती ‘नेपाळ टेलिकॉम’च्या शोभन अधिकारी यांनी दिली. 

दरम्यान, नेपाळ सध्या भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या इंटरनेट सेवेवर अवलंबून आहे. भैरहवा, बिरगुंज आणि बिराटनगर या भागातून टाकलेल्या ऑप्टिकल फायबर केबल्सच्या माध्यमातून ही सेवा पुरवली जाते.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या