Netflix यूझर्सना धक्का; ‘हे’ लोकप्रिय फीचर होणार बंद

Netflix | जगभरात नेटफ्लिक्स यूझरची संख्या प्रचंड मोठी आहे.सिनेमा आणि वेब सीरीज बघण्यासाठी जगभरातील प्रेक्षक नेटफ्लिक्स वापरतात. टीव्ही, स्मार्टफोनमध्ये कुठेही आणि कधीही नेटफ्लिक्स बघता येतं त्यामुळे अनेकांकडे त्याचं सबस्क्रिप्शन असतं.

मात्र, नवीन मिळालेल्या माहितीनुसार नेटफ्लिक्स यूझरला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जातंय. नेटफ्लिक्सकडून लोकप्रिय फीचर काढून घेतलं जाणार असल्याची माहिती आहे.

नेटफ्लिक्स आता डाउनलोडिंग किंवा ऑफलाइन असताना बघण्याचा पर्याय काढून घेत आहे. ग्राहकांची काही आवडती फीचर्स बंद होणार आहेत. नेटफ्लिक्स सध्या विंडोज 10 आणि विंडोज 11 ॲप्स बंद करणार असल्याचं म्हटलं जातंय. यासोबतच वेब ॲप्स आणली जाण्याची शक्यता आहे.

विंडोज 10 आणि विंडोज 11 ॲप्स बंद होणार?

जे युझर विंडोजवर नेटफ्लिक्स (Netflix ) बघतात, त्यांना आता डाउनलोडिंग आणि ऑफलाइन बघण्याची सोय नसणार आहे. येत्या काळात काही नवीन अपडेट्स नेटफ्लिक्स यूझरसाठी येणार आहेत. नवीन येणारं विंडोज ॲप अधिक आकर्षक असलं तरी त्यावर युझरला ऑफलाइन राहून कंटेंट बघता येणार नाही.

सध्याच्या विंडोज 10 आणि विंडोज 11 ॲप्समध्ये युझर त्यांना हवा तो कंटेंट फुल एचडी डाउनलोड करुन ऑफलाइन बघू शकतात.पण, नवीन अपडेटनंतर ही सुविधा बंद होणार आहे. फक्त मोबाईल आणि टॅबवर नेटफ्लिक्स बघताना ऑफलाइन कंटेंट बघण्याची सुविधा असणार आहे.

नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आता स्वस्त होणार?

त्यामुळे ग्राहकांना टीव्ही शोज आणि सिनेमे टीव्हीवर पाहता येणार नाहीत. मात्र, मोबाईलवर नेटफ्लिक्स (Netflix ) ग्राहक ऑफलाइन राहून बघू शकतील. यासोबत एक आनंदाची बातमी म्हणजे नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन आता स्वस्त होणार आहे. त्यावर आता जाहिरातीही दिसतील. दरम्यान, नेटफ्लिक्सचा ॲड सपोर्ट प्लॅन सध्या भारतात उपलब्ध नाहीये. त्यामुळे स्वस्त नेटफ्लिक्ससाठी सध्या तरी वाट बघावी लागेल.

News Title –  netflix download offline feature will be removed

महत्त्वाच्या बातम्या-

“मोदींनी पराभव स्वीकारावा, भाजपला फक्त..”; लोकसभेच्या निकालाबाबत ‘या’ नेत्याचा मोठा दावा

अजित पवारांचं टेन्शन वाढलं, बारामतीत पुन्हा एकदा पवार विरूद्ध पवार होणार लढत?

मोठी बातमी! ‘या’ तारखेला लागणार बारावीच्या निकाल?; बोर्डाकडून महत्वाची अपडेट

“माझ्याकडून काही चुका…”; मुलगा सैफबद्दल असं का म्हणाल्या शर्मिला टागोर?

राखीची तब्येत नाजूक, ‘या’ आजाराशी करतेय सामना?; एक्स नवऱ्याकडून खुलासा