बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नेटफ्लिक्सच्या स्क्विड गेमने मोडले सारे रेकॉर्ड्स! तब्बल ‘इतक्या’ मिलियन डॉलर्सची कमाई

मुंबई | मोठ्या प्रमाणात मनोरंजनपर गोष्टी उपलब्ध करुन देणारं ओटीटी प्लॅटफाॅर्म म्हणून नेटफ्लिक्सकडं पाहिलं जातं. जगभरातील तरुण वर्ग नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेऊन त्यावर चित्रपट आणि वेब सिरीज पाहतात. अशातच हल्ली तरुणांना सर्वात जास्त वेड लागलं ते म्हणजे कोरीयन सीरिजचं. तर एका कोरीयन सीरिजने तब्बल 900 मिलीयन डाॅलर्सची कमाई केली आहे.

17 सप्टेंबर 2021 रोजी प्रदर्शित झालेली स्क्विड गेम या कोरीयन वेब सिरीजने तब्बल 900 मिलीयन डाॅलर्सची कमाई केली आहे. ही वेब सीरिज कर्जात बुडलेल्या लोकांवर आधारीत आहे. या आधी ब्रिजर्टन वेब सिरिजने हा रेकाॅर्ड मोडला होता. मात्र आता स्क्विड गेम या वेब सिरीजने आतापर्यंतचे सर्व रेकाॅर्ड मोडले आहेत.

स्क्विड गेम ही वेब सीरीज 9 एपिसोडची आहे. कर्जात बुडालेल्या लोकांना पैशांचे आमिष दाखवून खेळात सहभागी केले जाते. त्यानंतर सर्व लोकांना मारण्यात येतं. तर हा खेळ जिंकलेल्या व्यक्तीला 38.7 मिलीयन डाॅलर्स मिळतात.

दरम्यान, सध्या कोरियन वेब सिरिजला प्रचंड पसंती मिळत आहे. अशातच या वेब सिरिजने रेकाॅर्ड ब्रेक केल्याने आता लोकांचा कळ कोरियन इंडस्ट्रीकडे प्रचंड वाढला आहे.

थोडक्यात बातम्या –

लवकरच साखरपुडा करेल…; कतरिना सोबतच्या साखरपुड्यावर विकी कौशलने सोडलं मौन

कौतुकास्पद! संकटाला आनंदाने सामोरं जाणाऱ्या पुण्याच्या आजीला नेटकऱ्यांनी केला सलाम

“उद्धव ठाकरेंनी मुस्लिमांसोबत जाऊन पक्ष बनवला आहे”

ग्राहकांची प्रतिक्षा संपली! टाटा मोटर्सची सर्वात स्वस्त SUV आली बाजारात

कोरोना लस टोचायला आलात तर खबरदार, अंगावर साप सोडण्याची दिली धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More