“पाच महिन्याची गरोदर आहेस, हे शोभतं का तुला?”; दीपिकाच्या ‘त्या’ कृत्यावर नेटकरी भडकले

Deepika Padukone | बॉलीवुड अभिनेत्री दीपिका पदूकोण लवकरच आई होणार आहे. या सप्टेंबर महिन्यात दीपिका आपल्या बाळाला जन्म देणार आहे. अशात ती आपल्या प्रोफेशनल लाईफकडेही अधिकचे लक्ष देत आहे. दीपिका आपल्या आगामी ‘कल्की 2898 एडी’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये सध्या व्यस्त आहे.

नुकतीच तिने या चित्रपटाच्या प्री-रिलीज इव्हेंटला हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाच्या चेहऱ्यावर वेगळाच ग्लो दिसून आला. तिने काळ्या रंगाचा ड्रेस घातला होता.यामध्ये तर तिचं सौंदर्य अजूनच खुलून आले होते.ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसमध्ये असलेल्या दीपिकाने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

हाय हिल्सवरून दीपिकावर भडकले नेटकरी

मात्र, याच कार्यक्रमात असं काही घडलं, ज्यामुळे चाहते आता दीपिकावर भडकले आहेत. झालं असं की, ब्लॅक बॉडिकॉन ड्रेसवर दीपिकाने हाय हिल्स घातल्या होत्या. यावरून चाहत्यांनी तिच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

दीपिका (Deepika Padukone) 5 महिन्यांची गरोदर आहे. अशात तिने हाय हिल्स घातल्याने चाहते तिच्यावर भडकले आहेत.’ गरोदरपणात अशा हाय हिल्स धोकादायक असतात.’, असं एक यूझर म्हणाला. तर, ‘तुम्हाला किती सुंदर, ग्लॅमरस दिसायचे असले तरी अशा अवस्थेत हाय हिल्स टाळायला हवे.’, असं दूसरा एक यूझर म्हणाला.

‘या’ तारखेला रिलीज होणार ‘कल्की 2898 एडी’

काही जणांनी दीपिकाचं कौतुक केलंय. तर, काही यूझरने तिच्यावर टीका केली आहे. हाय हिल्समध्ये गरोदर स्त्रीला आपला तोल सांभाळता येत असेल तर काहीच हरकत नाही. दीपिका ग्लॅमरस दिसत असल्याचे एका यूझरने म्हटले. त्यामुळे सध्या दीपिका चर्चेत आली आहे.

दरम्यान, दीपिकाचा (Deepika Padukone) आगामी चित्रपट ‘कल्की 2898 एडी’ याचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नाग अश्विन यांनी केले आहे. चित्रपटात प्रभास, दीपिका पदुकोण, अमिताभ बच्चन, कमल हसन, दिशा पटानी दिसणार आहेत. या चित्रपटात प्रभास भैरवची भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत आहेत. चित्रपट 27 जून रोजी रिलीज होणार आहे.

News Title :  Netizens rage over Deepika Padukone

महत्त्वाच्या बातम्या-

“उज्ज्वल निकम यांची सरकारी वकीलपदी नियुक्ती लोकशाहीसाठी घातक”

कोल्हापुरात अजित पवार गटाला मोठा झटका?, माजी आमदार मविआच्या वाटेवर?

हायकोर्टाने दिला मोठा झटका; 65 टक्के वाढीव आरक्षणाचा निर्णय रद्द

मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं विधान!

लोकसभेतील अपयश सामूहिक, ‘अकेला देवेंद्र’ जबाबदार नाही’