बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्राजक्ता माळीचा बोल्ड अंदाज, बिनाब्लाऊजच्या साडीत बघून नेटकरी संतापले

मुंबई | मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा (Prajakta Mali) हटके अंदाज चाहत्यांना नेहमीच भुरळ पाडतो. प्राजक्ता सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असून तिचे हटके फोटोज ती नेहमीच शेअर करत असते.

सध्या प्राजक्ताच्या चंदेरी सिल्क साडीतील फोटो सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घालत आहेत. या फोटोत प्राजक्ताने पीच कलरची चंदेरी सिल्क साडी नेसली असून या फोटोलो तिने ‘शारद सुंदर चंदेरी राती थंड या हवेत घेऊन कवेत’, असं कॅप्शन दिलं आहे.

या हटके कॅप्शन सोबत शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण प्राजक्ताने साडीसोबत ब्लाऊज परिधान केलेला नाही. या फोटोत प्राजक्ता ग्लॅमरस दिसत असली तरी अनेकांनी तिला ट्रोल केलेलं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, ब्लाऊज घालायला विसरली का? साडी आवरता येत नाही तर नेसली कशाला?, अशा कमेंट काही जणांनी केल्या आहेत. तर अनेकांनी कमेंट्स करत प्राजक्तावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. प्राजक्तापूर्वी अनेक अभिनेत्रींना ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

थोडक्यात बातम्या-

राणा दांपत्यावरील ‘ती’ कारवाई ठाकरे सरकारच्या अंगलट, न्यायालयाने सरकारला फटकारलं

झोया शेख ठरल्या ‘Mrs. Maharashtra’ किताबाच्या मानकरी

“बहुजनांना तुमच्या सारखाच शकुनी काकांचा हुजऱ्या समजू नका”

थाटात पार पडला राज ठाकरेंच्या नातवाचा नामकरण सोहळा, बाळाचं नाव आहे अगदी खास

मोठी बातमी! नवाब मलिकांना न्यायालयाचा दणका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More