बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भारताचे पुढील पंतप्रधान गौतम अदानी होणार”

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खाजगीकरणाचा सर्वाधिक फायदा देशातील दोन मोठ्या उद्योगपतींना करून दिल्याचा आरोप विरोधक सातत्यानं करत असतात. त्यातील एक नाव म्हणजे अदानी समुहाचे सर्वेसर्वा गौतम अदानी हे आहेत. अदानी यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं त्यावरून सुरू झालेला वाद थांबलेला नाही.

भारताची अर्थव्यवस्था 2050 मध्ये 30 बिलीयन डाॅलर्सची होईल. तेव्हा भारतातील कोणीच उपाशी पोटी झोपणार नाही. 2050 यायला अजून तब्बल 10 हजार दिवस शिल्लक आहेत. मला विश्वास आहे की आपण गरीबीला संपवू, असं ट्विट अदानी यांनी केलं होतं. त्यानंतर त्यावर काॅमेडियन राजीव निगमनं टीका केली आहे.

इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जाॅन्सन आणि अदानींचा फोटो शेअर करत निगम यांनी भारताचा पुढील पंतप्रधान अदानी होणार असं कॅप्शन दिलं आहे. यावर आता नेटकरी प्रतिक्रिया देत आहेत. तु काॅमेडियन आहेस आपलं काम कर असं एक नेटकरी म्हणाला आहे. त्यानंतर एकानं अदानी यांना सल्ला देताना नोकऱ्या द्या असं म्हटलं आहे. आज पण अदानी हेच पंतप्रधान आहेत कारण जे पाहिजे ते विकत घेतात, असं एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे.

दरम्यान, बोरिस जाॅन्सन भारत दौऱ्यावर आले असताना त्यांनी गुजरातला भेट दिली होती. तेव्हा अदानी यांनी जाॅन्सन यांच्या स्वागतासाठी मोठी तयारी केल्यानं विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. तसंच नेटकरी देखील भाजपवर जोरदार टीका करत आहेत.

पाहा ट्विट – 

 

थोडक्यात बातम्या – 

“जर कोणी हिटरल प्रवृत्तीनं वागायचं ठरवलं असेल तर…”

“निवडणुका होण्यापूर्वीच मी येणार मी येणारच्या घोषणा दिल्या आता मात्र…”

किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

“…तर लोक या महाराष्ट्रद्रोह्यांना जागोजागी चपला मारतील”

‘या’ खास कारणामुळे ट्विटरवर ट्रेंड होतोय शाहरूखचा मन्नत बंगला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More