Top News राजकारण

“उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही”

मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्ताने सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीनंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हल्लाबोल केलाय.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला मुलाखत दिली. मात्र पण त्यामध्ये वर्षपूर्तीचा आढावा हवा होता. मात्र ते दिसलंच नाही. मुलाखतीत फक्त धमक्या दिसल्या, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

उद्धव ठाकरेंसारखा धमकावणारा मुख्यमंत्री इतिहासात पाहिला नाही, असा थेट हल्ला फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर केलाय.

शिवाय मुख्यमंत्री संयमी आहेत हे ऐकून होतो. परंतु दसरा मेळाव्याचं भाषण असो की सामन्याची मुलाखत यातून मुख्यमंत्री संयमी नसल्याचं दिसून आलं असल्याची, बोचरी टीका फडणवीस यांनी केलीये.

महत्वाच्या बातम्या-

“असा अचानक झालेला काळाचा घाला सर्वांना धक्का देणारा आहे”

जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेला लोकनेता हरपला- उपमुख्यमंत्री अजित पवार

भारत भालके यांचं निधन चटका लावणारं; कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपलं- शरद पवार

“गोरगरिबाचं पोरगं राजकारणात येऊन यशस्वी होऊ शकतं, हे आपण सिद्ध करुन दाखवलं”

“मतदारसंघाच्या विकासासाठी भालके नेहमी धडपड करायचे; महाराष्ट्राने एक चांगला नेता गमावला”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या