बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डाॅक्टर होऊ घातलेल्या ऊसतोड कामगाराच्या मुलाची कोरोनाशी झुंज अपयशी; मित्रांनी उपचारासाठी जमवले होते पैसे

परभणी | देशभरात थैमान घातलेल्या कोरोनानं अनेक लोक हतबल झाले आहेत. अशातच एक ह्रदयद्रावक घटना समोर येत आहे. डाॅक्टर होण्याचं स्वप्न बघणाऱ्या ऊस तोडणी कामगाराच्या मुलाचा कोरोनानं बळी घेतल्यानं सगळीनं हळहळ व्यक्त केली जात आहे.

अनेक लोक कष्ट करुन आपली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करत असतात. असाच एक तरुण आपल्या ऊस तोडणी कामगार कुटुंबाला कष्टाच्या जोखडातून मुक्त करण्याची स्वप्न पाहत होता. परभणीच्या पाथरी येथील आनंद नगर तांड्यावर राहणारा राहुलची एमबीबीएस पदवीची शेवटच्या वर्षाची परीक्षा झाली. यावेळीचं त्याला कोरोनाची लक्षणं जाणवतं होती. पण परीक्षा नाही दिली, तर सहा महिने वाया जातील. या भीतीनं राहुलने आजारी असूनही परीक्षा दिली. दरम्यान, कोरोनामुळे त्याची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्याला औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

महिन्याभरापासून सुरू असलेली कोरोनासोबतच्या लढ्यात राहुलला अपयश आलं आहे. त्यानं आज सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. घरातील गरीब परिस्थितीपुढे कधीही हार न मानणारा राहुल कोरोनासमोर हरल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, राहुल आपल्या आई वडिलांना उसतोड कामात मदतही करत होता. घरची परिस्थिती बिकट असल्यानं त्याच्या उपचारासाठी मित्रांनी आणि महाविद्यालयाने निधीही उपलब्ध करून दिला होता. पण त्याची कोरोनाशी लढाई अपयशी ठरली आहे.

थोडक्यात बातम्या – 

पोलिसांच्या उपस्थितीत कोरोना नियमांचं उल्लंघन करत बर्थडे सेलिब्रेशन करणं शिवसेना नेत्याला पडलं महागात

भाजपला धक्का! 10 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत हाती बांधलं शिवबंधन

हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी केंद्र सरकारकडून नवी नियमावली जारी

मुंबईत आज बरे होणाऱ्यांच्या संख्येपेक्षा नव्या कोरोनाबाधितांची संख्या अधिक, पाहा आकडेवारी

“बाबा रामदेव यांनी माफी मागितली नाही, तर 1 हजार कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकू”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More