पुणे| राज्यात कोरोना विषाणू थैमान घालतोय. अशातच आता पुण्यातील चिंचवड परिसरात आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं आढळलं आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 16 झाली आहे.
पिंपरी चिंचवड भागातील ही व्यक्ती जपानला जाऊन आली होती. 14 मार्चला या व्यक्तीची कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचा अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याचं सूत्रांकडून समजत आहे. चिंचवड भागातील रूग्णांची संख्या आता 9 वर जाऊन पोहोचली आहे. त्यामुळं संपूर्ण परिसरात भितीचं वातावरण आहे.
पुण्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे शहरातील सर्व सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आता शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी करण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून विचार सुरु आहे.
राज्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 33 वर पोहोचला आहे. याआधी औरंगाबादमधील 59 वर्षीय महिला कोरोना बाधित असल्याचे आज सकाळी समोर आले. रशिया व कझाकिस्तानचा प्रवास करून ही महिला भारतात परतली आहे. सध्या औरंगाबादेतल्या धूत रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
कोरोनाने हैरान केलंय… आता आला ‘बर्ड फ्लू!’
‘तू कपडे घातले की नाही?’; ‘त्या’ व्हीडिओमुळे मलायका अरोरा…
महत्त्वाच्या बातम्या-
खासगी ट्यूशनवाल्यांनो, क्लास बंद ठेवा अन्यथा कारवाईला सामोरं जा!
कोरोना संदर्भात सर्वांनी एकत्र लढण्याची गरज; नरेंद्र मोदींचं आवाहन
करावं तेवढं कौतुक कमी! साखरपुड्यात लग्न उरकून उरलेले पैसे दिले कोरोनाग्रस्तांना
Comments are closed.