मुख्य आरोपीला पकडण्यासाठी बक्षीस :
या घोटाळ्यातील मुख्य आरोपी उल्हानाथन अरुणाचलम उर्फ अरुण याला पकडण्यासाठी बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. बँकेचे माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता (Hitesh Mehta) यांनी १२२ कोटी रुपयांपैकी ४० कोटी रुपये उल्हानाथन अरुणाचलमला (Ulahnathan Arunachalam) दिल्याची कबुली दिली होती.
Bank Scam l हिरेन भानूच्या भूमिकेवर संशय :
अटक केलेले आरोपी मनोहर अरुणाचलम, हितेश मेहता, धर्मेंद्र पौण आणि माजी सीईओ अभिमन्यू पौण यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी, ईओडब्ल्यूने न्यायालयाला सांगितले की, काही पुरावे उपाध्यक्ष हिरेन भानू यांच्या सहभागाकडे निर्देश करतात. त्यामुळे भानूकडे घोटाळ्याबाबत किती माहिती होती आणि त्याची यात काय भूमिका होती, याचा तपास सुरू आहे.
हितेश मेहताची लाय डिटेक्टर चाचणी (Lie detector test) :
तपास यंत्रणेने हितेश मेहताची लाय डिटेक्टर चाचणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. ईओडब्ल्यूने दावा केला आहे की, हितेश मेहता तपासात सहकार्य करत नाही. तसेच, पैसे रोखीने दिले गेल्यामुळे व्यवहाराचा कोणताही डिजिटल रेकॉर्ड (Digital record) नाही. त्यामुळे घोटाळ्यातील पैशांचा योग्य माग काढण्यासाठी लाय डिटेक्टर चाचणी आवश्यक आहे. या घोटाळ्यात आणखी काही मोठ्या नावांचा सहभाग असण्याची शक्यता असून, ईओडब्ल्यू त्यांची चौकशी करत आहे. तसेच, इतर आरोपींवरही कारवाई करण्याची तयारी सुरू आहे.