बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कुलू मनालीला फिरायला जायचं का?; पूजा-गबरुशेठ मधील नवीन संभाषण समोर आल्यानं खळबळ

पुणे | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. तिच्या आत्महत्या प्रकरणाशी संबंधित काही ऑडिओ क्लिप्स सोशल मीडियावर याआधीच व्हायरल झाल्या होत्या. या ऑडिओ क्लिपमध्ये दोन व्यक्तींच्या संभाषणात ‘ती आत्महत्या करणार आहे’ असा उल्लेख ऐकायला मिळाला, तर दुसरी क्लिप आत्महत्या केल्यानंतरची असल्याचा दावा केला जात होता.

पूजा चव्हाणच्या लॅपटाॅपमधील नवीन ऑडिओ क्लिप आता सोशल मिडीयात व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये पूजा एका गबरूशेठ नावाच्या इसमाशी संवाद साधत आहे. ज्यानुसार, तुमचा नंबर मी रिजेक्ट लिस्टमधून नंबर काढलाय, आपका हुकूम सर आँखों पर असं पूजा म्हणते त्यावर गबरूशेठ थँक्यू थँक्यू! असं उत्तर देतो.

पूजा पुढे बोलताना म्हणते, मुंबई-पुणे आता बस्स झालं! आता कुलू-मनाली, जम्मु-काश्मिरला जाऊ त्यावर गबरूशेठ शंभर टक्के नक्की जाऊ असं बोलतो, नंतर पूजा काम संपवुन लवकर परत या मग लगेच फिरायला जाऊ असं गबरूशेठला म्हणते. असं संभाषन असलेली एक ऑडिओ क्लिप आल्याने हा गबरूशेठ कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मूळची परळी येथील २२ वर्षीय पूजा चव्हाण शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याला आली होती. ती आपला चुलत भाऊ आणि त्याच्या एका मित्रासोबत महमंदवाडी परिसरातल्या हेवनपार्क सोसायटीमध्ये राहात होती. याच सोसायटीत पूजाने आत्महत्या केली होती.

थोडक्यात बातम्या-

“…तर उद्धव ठाकरे आपल्या जवळच्या व्यक्तीलाही सोडत नाहीत”

कुख्यात गुंड गजा मारणे विरोधात पुणे पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

खासदार डेलकर मृत्यू प्रकरणातलं गूढ वाढलं; पोस्टमार्टम रिपोर्टमधून ‘ही’ माहिती आली समोर

…अन् त्याने जखमी हाेऊनही स्वत:च्या रक्ताने लिहून ठेवला पुरावा

प्रेरणादायी! लेकीसाठी बापाने चक्क शेतात क्रिकेटचं मैदान केलं उभं

 

 

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More