महाराष्ट्र मुंबई

धक्कादायक! एक तासापूर्वी जन्मलेलं बाळ सापडलं नाल्यात

मुंबई | वडोल गावातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गावातील नाल्यात एका पिशवीत एक तास जन्मलेलं अर्भक सापडलं आहे. रडण्याच्या आवाजामुळे ते बाळ स्थानिकांनी त्याला उचललं.

राज्यात एवढी कडाक्याची थंडी असताना नुकत्याच जन्मलेल्या बाळाला पिशवीत घालून पाण्याने भरलेल्या नाल्यात फेकून दिलं. 

पोटच्या बाळाला फेकून पळून जाणाऱ्या आई-वडिलांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या बाळाच्या माता-पित्यांचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.

दरम्यान, त्या बाळाची प्रकृती स्थिर असून त्याला बालरोग शल्य चिकित्सकांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-पाकिस्तानात दहावी फेल उडवताहेत सरकारी विमानं!

-पुण्यातल्या रस्त्यांवर गाडी चालवत असाल तर सावधान, उद्यापासून भरावा लागू शकतो दंड!

-बनावट स्टँम्प घोटाळ्यात आरोपी तेलगी ठरला निर्दोष

-“राणे साहेबांवर टीका करायची एकात पण औकात नाही”

-भीम आर्मीला मोठा धक्का, न्यायालयाने देखील पुण्यातील सभेला परवानगी नाकारली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या