मुंबई | कोणताही व्यवसाय सुरळीत चालण्यासाठी पहिली तीन वर्ष खूप महत्त्वाचे असतात. या तीन वर्षात जवळपास 80 टक्के व्यवसाय बंद पडतात. त्याला कारण असते भांडवल. जवळपास सर्व उद्योजक आपल्याजवळील भांडवल गुंतवून टाकत असतात. त्यामध्ये इमारत बांधणे असेल, फर्निचर तयार करणे असेल किंवा माल भरणे असेल. जर उद्योग मॅन्युफॅक्चरिंग चा असेल तर मशिनरी आणि कच्च्या मालामध्ये सर्व भांडवल संपून जाते. मग प्रश्न येतो मार्केटिंग कसे करायचे? कारण मार्केटिंग ला पैसे शिल्लक राहत नाहीत आणि खूप चांगला असणारा व्यवसाय पैशांअभावी दम तोडतो. मग अशा वेळी जर आपल्याला 50 लाखांपर्यंत फँडीग मिळत असेल तर ? किती चांगलं होईल .हो हे शक्य होणार आहे फक्त स्टार्टअप स्टुडिओ मुळे …तर काय आहे हे स्टार्ट स्टुडिओ कल्पना?
जे मराठी तरुण-तरुणी व्यवसायात आहेत किंवा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छितात अशा जिद्दी लोकांसाठी इंडिया नेटवर्कचे उद्योजक, गुंतवणूकदार आणि प्रेरक वक्ता राहुल नार्वेकर घेऊन आले आहेत एक भन्नाट संकल्पना जिचे नाव आहे स्टार्टअप स्टुडिओ.. इंग्रजी भाषेत पारंगत नसणाऱ्या मराठी उद्योजकांच्या बोटाला धरून व्यवसायात एक पाऊल पुढे घेऊन जाण्यासाठी या स्टार्ट अप स्टुडिओचा जन्म झाला आहे. हा स्टार्टअप स्टुडिओ मराठी उद्योजकांना मराठी आणि हिंदी भाषेमधून व्यवसाय पुढे कसा घेऊन जायचा ? यावर अभ्यासक्रम तयार करून त्याचे प्रशिक्षण सुद्धा देणार आहे. यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून रजिस्ट्रेशन करायचे असून आजपासून एक मे 2020 पर्यंतच तुम्ही अर्ज करू शकता.
समजा तुमची या निवड प्रक्रियेमध्ये निवड झाली तर तुमच्या बॅचला स्वतःचे स्टार्टअप कसे सुरु करावे ? या विषयावर सात दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे .तसेच पुढच्या सहा महिन्यांसाठी तुमच्या व्यवसायाला संबंधित तज्ञ मार्गदर्शकाचे मार्गदर्शन लाभणार आहे .शिवाय व्यवसायवृद्धीसाठी तब्बल पन्नास लाखांचे भांडवलही मिळणार आहे. तसेच पुढे निधीची उभारणी कशी करायची ? यावर ही मदत केली जाणार आहे .या नेटवर्कला तुमच्यासारख्या हुशार आणि लाथ मारेल तिथे पाणी काढेल.अशा ध्येयाने पेटलेल्या 25 जणांची आवश्यकता आहे. या 25 लोकांच्या तुकडीला ईडीआय आणि आयआय एम ए येथे आठवड्याभराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
हा उपक्रम तब्बल सहा महिन्यांचा असणार आहे. या प्रकारे आम्ही जगभरातील पाच हजारांपेक्षा जास्त लोकांचे नेटवर्क उभारणार आहोत. जे पुढील फेरीत भाग घेतील .आमचा उद्देश हा उद्योजकांच्या क्षमता ओळखणे, त्यांचे कुठलेही शोषण होऊ न देता पालनपोषण करणे. त्यांना पुढील स्तरावर घेऊन जाणे हा आहे. पुढील दोन वर्षात आमच्याकडे चार बॅच सह शंभर स्टार्ट अप ची एक स्ट्रॉंग टीम असणार आहे, आणि हा खटाटोप फक्त मराठी उद्योजकांना जगाच्या नकाशात झळकवण्यासाठी चाललेला आहे. तेव्हा वाचकहो तुम्ही सुद्धा आपल्या मराठी माणसांसाठी ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून मराठी नवउद्योजक घडविण्यासाठी या चळवळीत भाग घ्या.. रजिस्ट्रेशन साठी लिंक – TheIndianetwork.in
ट्रेंडिंग बातम्या-
नागरिकांना पैशाची उणिव भासणार नाही- सीतारामन
आई-वडीलांना मरण्यासाठी सोडू शकत नाही; अक्षय कुमारकडून 25 कोटींची मदत
महत्वाच्या बातम्या-
‘स्वराज्यरक्षक संभाजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला; ‘या’ तारखेपासून होणार प्रक्षेपणॉ
सॅल्यूट… आभाळाएवढं मन असणाऱ्या टाटांची आणखी 1 हजार कोटींची मदत!
Comments are closed.