देश

पीएनबीच्या निवृत्त अधिकाऱ्याविरोधात सीबीआयचे नवं आरोपपत्र

नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बॅंकेचा निवृत्त उपव्यवस्थापक गोकुळनाथ शेट्टी याच्या विरोधात सीबीआयने नवं आरोपपत्र दाखल केलं आहे. त्यामध्ये शेट्टी आणि त्याची पत्नी आशालता शेट्टी या दाम्पत्याने 2 कोटी 63 लाख रुपयांची बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्‍सी यांनी कर्जाच्या रूपाने पीएनबीला तब्बल 13 हजार कोटी रुपयांचा गंडा घातला. त्यांच्याशी संगनमत केल्याच्या आरोपावरून शेट्टी आधीपासूनच सीबीआयच्या रडारवर आहे.

आता शेट्टी दाम्पत्याविरोधात 6 वर्षांच्या कालावधीत 4 कोटी 28 लाख रुपयांची संपत्ती जमा केल्याप्रकरणी भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या-

“माझा मुलगा दोषी असेल, तर त्याला सगळ्यांसमोर गोळ्या घाला पण…”

“हाथरस प्रकरणातील तरुणीची तिच्या आई आणि भावानेच हत्या केली, ते चारही युवक निर्दोष”

“योगीजी मी तुमच्यापेक्षा वरिष्ठ आहे, माझं ऐका, पीडितांना भेटू द्या”

“पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून जबाबदारी झटकू नका, योगीजी राजीनामा द्या”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या