गुडन्यूज! PM आवाज योजनेत आता ‘या’ लोकांनाही मिळेल हक्काचे घर

PM Awas Yojana | गेल्या अनेक वर्षांपासून देशात पंतप्रधान आवास योजना राबवली जाते. या योजनेचा लाखो लोकांना फायदा झाला आहे. नागरिकांना ग्रामीण किंवा शहरी भागात स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी सरकार आर्थिक सहाय्य करते. या योजनेत आता मोठा बदल करण्यात आला आहे. (PM Awas Yojana)

या बदलामुळे पंतप्रधान आवास योजनेची व्याप्ती आणखी वाढणार असून त्याचा लाखो लोकांना फायदा होईल. सरकारने ग्रामीण भागासाठी राबवल्या जाणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेत काही बदल केले आहेत.या योजनेतील एका नियमामुळे अनेक अर्जदार अपात्र ठरवले जायचे.

सरकारने नेमका काय बदल केला?

मात्र, आता सरकारने या नियमात मोठा बदल केला आहे.या नवीन नियमानुसार आता, एखाद्या अर्जदाराचे मासिक उत्पन्न 15 हजार रुपये असेल तसेच त्याच्या घरी लँडलाईन फोन ,दुचाकी, फ्रीज असले तरीही त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे. त्याला बाद ठरवले जाणार नाही. यापूर्वी अशा अर्जदारांना अपात्र घोषित केले जाई. आता मात्र, या नियमात बदल झाला आहे. (PM Awas Yojana)

याआधी अर्जदाराचे मासिक उत्पन्न 10 हजार रुपये असले किंवा त्याच्या घरी दुचाकी असली की त्याला अपात्र ठरवले जायचे.मात्र, आता घरी फ्रीज, दुचाकी, लँडलाईन फोन असला तरी अर्जदारांना योजनेचा लाभ मिळणार आहे.

PM Awas Yojana मध्ये किती मदत मिळते?

पंतप्रधान आवास योजना (ग्रामीण) या योजनेची सुरुवात 2015 साली झाली. यामध्ये ग्रामीण भागातील गरीब नागरिकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकारकडून पैसे देण्यात येतात. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला एकूण एक लाख 20 हजार रुपये दिले जातात.

सदर रक्कम ही तीन टप्प्यात देण्यात येते. पहिल्या टप्प्यात एकूण 70 हजार रुपये दिले जातात. तर दुसऱ्या टप्प्यात 40 हजार आणि तिसऱ्या टप्प्यात 10 हजार रुपये दिले जातात.आता नुकताच या योजनेत बदल करण्यात आला आहे. (PM Awas Yojana)

News Title : New changes in PM Awas Yojana 

महत्त्वाच्या बातम्या-

आनंदवार्ता! सोनं तब्बल ‘इतक्या’ हजारांनी घसरलं, काय आहेत सध्या भाव?

नीरज चोप्राने मोडला ऑलिम्पिकचा रेकॉर्ड; पाहा डायमंड लीगमधील बेस्ट थ्रो VIDEO

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या दोन्ही जागा महायुतीकडे; ‘या’ दोन नेत्यांची बिनविरोध निवड!

आज ‘या’ राशींच्या व्यक्तींना आर्थिक तोटा होईल, ताणतणाव वाढेल!

बदलापूर प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबीयांचा खळबळजनक खुलासा!