मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जनतेची संवाद ; वाचा संवादातील मुद्दे
मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी लाॅकडाऊनचे संकेत दिले होते. आज जनतेशी ऑनलाईन संवाद साधुन त्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेशी संवाद साधला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या संवादातील महत्वाचे मुद्दे –
- कोरोनापासून मार्ग काढण्यासाठी हा संवाद असल्याचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
- RTPCR चाचण्यांवर महाराष्ट्रात भर देण्यात येत असून 70 टक्के चाचण्या या RTPCR असल्याचं मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य.
- मला विलन ठरवलं गेलं तरीही माझी जबाबदारी पार पाडणार असा विरोधकांना टोला देत मुख्यमंत्र्यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला.
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर महाराष्ट्रात सदृश्य परिस्थिती झालेली आहे.
- अद्याप महाराष्ट्रात लॉकडाऊन संदर्भात कोणताही निर्णय नाही.
- येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन लावायचा की, मिनी लॉकडाउन लावायचा यावर चर्चा करून योग्य तो निर्णय घोषित होणार.
महाराष्ट्रातील अर्थचक्राचा आणि एकंदर रोजगाराचा विचार करता लाॅकडाऊन हा काही पर्याय नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्टं केलं आहे. तसेच येणाऱ्या काळात परत एकदा लाॅकडाऊन करण्यासंदर्भात तज्ज्ञांशी चर्चा करून 2 दिवसात सुधारीत आदेश देण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
थोडक्यात बातम्या –
अन् चक्क मुख्यमंत्र्यांच्या हेलिकाॅप्टरला मारावा लागला धक्का, पाहा व्हिडीओ
“दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा”
आज राज्यसरकारतर्फे कोरोनासंदर्भात ‘या’ 5 महत्वाच्या घोषणा होण्याची शक्यता
कोरोना लसीसंदर्भात नाना पटोले यांचं मोठं वक्तव्य; केली ‘ही’ मागणी
नियम धाब्यावर बसवुन साताऱ्यात कशी हजारोंच्या संख्येने पार पडली यात्रा, पाहा व्हिडीओ
Comments are closed.