पुुणे । पुणे शहरात कोरोनाच्या रूग्णांची वाढती संख्या पाहता पुणे महानगरपालिकेने कडक पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. तसेच पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी नवी नियमावली जाहीर केली आहे.
पहिल्यांदा मास्क न घातल्यास 500 रूपयांचा दंड भरावा लागेल, पुन्हा तोच व्यक्ती मास्क न घालता आढळल्यास त्याच्याकडून 1 हजार रूपयांचा दंड वसूल केला जाईल, असं जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी सांगितलं.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागली आहे. 19 फेब्रुवारी रोजी राज्यात 6 हजार 112 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.
कोरोनामुक्त होणाऱ्या एकूण रुग्णांची संख्या 19 लाख 89 हजार 963 इतकी झाली आहे. सध्या राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतकं आहे.
दरम्यान, मुंबई, पुणे, नागपुरसह विदर्भातदेखील काही शहरांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मुंबई पाठोपाठ आता नागपूर महानगरपालिकेनेही कोविड-19च्या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे.
थोडक्यात बातम्या –
“संजय राठोड सर्व मंत्र्यांच्या संपर्कात, योग्य वेळ येताच माध्यमांसमोर येतील”
मुंबई-पुण्यात कोरोनाच्या रुग्णांची धक्कादायक नोंद, जाणून घ्या आजची आकडेवारी!
कोरोनामुळे ‘या’ शहरात पुन्हा कडक निर्बंध, अंत्यविधीला फक्त 20 जण तर हॉटेल्स…
राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार सरकारलाच नडला, गुन्हा दाखल झाला पण शिवजयंती साजरी केलीच!
कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय पण प्रसिद्ध डॉ. तात्याराव लहानेंनी दिली दिलासादायक माहिती