बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicronचा धोका वाढतोय; केंद्र सरकारचं महाराष्ट्राला तातडीचं पत्र

मुंबई | अवघ्या जगावर गत दोन वर्षांपासून कोरोना महामारीचं (Corona) संकट घोंघावत आहे. कोरोनाचा प्रभाव आता थोडासा कमी झाल्यासारखं वाटायला लागलं की लगेच कोरोनाच्या नव्या व्हेरियंटनं सर्वत्र धुमाकुळ घातला आहे. कोरोनाच्या इतर व्हेरियंटच्या तुलनेत ओमिक्राॅनचा (New Corona Omicron variant) अधिक प्रमाणात धोका असल्याची माहिती सध्या प्राप्त होत आहे.

ओमिक्राॅनच्या (Omicron) वाढत्या प्रभावामुळं सध्या सर्वजण चिंतेत आहेत. या व्हेरियंटचा (Veriants) सामना करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना राबवण्याच्या सुचना सध्या केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येत आहेत. सध्या या प्रकारचे रूग्ण हे बाहेरच्या देशात मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. याला आपल्या देशात येण्यापासून रोखण्यासाठी केंद्रीय विमान वाहतूक मंत्रालयानं मार्गदर्शक सुचना (Guidelines) जारी केल्या आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही राज्याच्या आरोग्य विभागाला पत्राद्वारे परिस्थितीवर लक्ष ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची आरटीपीसीआर चाचणी (RTPCR test) घेण्यात यावी, सर्व प्रवाशांना सक्तीचे होम क्वारंटाईन असेल, मुंबई सोडून इतर ठिकाणी जाणाऱ्या विमान प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणी निगेटीव्ह आली तरच विमानतळ सोडता येणार आहे, परराज्यातून येणाऱ्या प्रत्येकाकडं किमान 48 तास अगोदरचा आरटीपीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या सर्व सुचना केंद्र सरकारच्या पत्रात आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारनं नुकतंच आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी लावली आहे. ही बंदी काही दिवसांपूर्वीच हटवण्यात आली होती. पण ओमिक्राॅनचा वाढता धोका लक्षात घेता सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारे कोणताही धोका पत्करायच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेण्याची गरज आहे.

थोडक्यात बातम्या 

लागला की मेळ! ना काॅंग्रेस, ना भाजप…’या’ भेटीमुळे देशात तिसऱ्या आघाडीची चर्चा

“काँग्रेसला ना इज्जत ना किंमत, झुकायचं की नाक घासायचंय हा…”

…अन् ‘त्या’ घटनेनंतर खासदारानं वाटले चक्क ‘चाॅकलेट आणि आंब्याचे पापड’

‘Sharad Pawar युपीएचे नेते होणार का?’, ममता बॅनर्जी म्हणतात…

“ठाकरे सरकार अपशकुनी, फडणवीस सरकारनं मिळवलेलं Maratha Reservation घालवलं”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More