बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Omicron वाढतोय, शाळा सुरू होणार का?; वर्षा गायकवाड म्हणतात…

मुंबई | कोरोना (Corona) रूग्णसंख्या कमी होत असताना आता कोरोनाच्या Omicron variant ने दहशत पसरवल्याचं दिसून येतंय. काही दिवसांपूर्वी पाश्चिमात्य देशात धुमाकूळ घालणारा हा व्हेरिएंट आता भारतात तसेच महाराष्ट्रात दाखल झाल्याने आता केंद्र आणि राज्य सरकार अलर्ट झालं आहे. अशातच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. मात्र आता Omicron मुळे शाळा (school)  सुरू होणार का?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.

Omicron variantचा प्रसार वेगवान असल्याने आता शाळा सुरू होणार की नाही, यावर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. त्यावर आता राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे. आम्ही ज्यावेळी नियम बनवले होते, त्यावेळी या सर्व गोष्टींचा विचार करूनच नियम बनवले होते, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

आम्ही टास्क फोर्सशी सात्त्याने बोलत आहे. त्यांना आम्ही नियमावली देखील पाठवली होती. त्यावर आमची चर्चा देखील झाली होती आणि त्यानंतरच ही नियमावली निश्चित झाली होती. याशिवाय जर काही निर्णय घेईचा झाला तर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असो किंवा इतर गोष्टी आम्ही त्यावर लक्ष ठेऊन आहे, असंही वर्षा गायकवाड म्हणाल्या आहेत.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्य सरकारमधील सर्वांचं या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष आहे. देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये परदेशातून जे प्रवासी येतात त्यांच्यासंबंधी केंद्र सरकारनंही कठोर भूमिका घेतली पाहिजे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

शिवेंद्रराजेंना धक्का! शरद पवारांच्या एका मताने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट

‘कुणी मायीचं दूध पिलेला असेल तर..’; रावसाहेब दानवेंचं विरोधकांना ओपन चॅलेंज

अभिनेत्री कतरिना कैफच्या लग्नातील ‘तो’ व्हिडीओ पाहून चाहते संभ्रमात, पाहा व्हिडीओ

“मिलिंद नार्वेकर म्हणजे नवे शिवसेनाप्रमुख का?”

देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे मी केंद्रीय मंत्री – नारायण राणे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More