Top News कोरोना

ब्रिटनमध्ये नवा कोरोनाचा विषाणू; पण भारत सरकार म्हटतंय ‘नो टेन्शन’!

नवी दिल्ली | नुकतंच ब्रिटनमध्ये कोरोना संसर्गाचा एक नवीन विषाणू आढळून आलाय. यामुळे ब्रिटनमध्ये पुन्हा एकदा कडक लॉकडाउन जाहीर केला गेलाय.

दरम्यान केंद्र सरकारने याविषयी सोमवारी दुपारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान बोलताना डॉ. हर्षवर्धन यांनी नव्या संसर्गाला घाबरुन जाण्याचं काही कारण नसल्याचं म्हटलंय.

केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, “देशातील जनतेच्या सुरक्षेसाठी गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने गरजेचे सर्व निर्णय घेतलेत. त्यामुळे कोणती पावलं उचलावी याबाबत पूर्ण कल्पना सरकारला आहे. माझ्या मते देशातील नागरिकांनी घाबरण्याचं कोणतंही कारण नाहीये.”

दरम्यान ब्रिटनमधील व्हायरस पाहता भारतात येणाऱ्या विमानांवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसंच राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केलीये.

थोडक्यात बातम्या-

शरद पवार जर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार असतील तर…; फडणवीसांचं मोठं वक्तव्य!

“ब्रिगेडी हिंदुत्ववाद्यांनी राममंदिर वर्गणीला टार्गेट करणं स्वाभाविकच”

‘…तर पहिला कडेलोट संजय राऊतांचा केला असता’; निलेश राणेंची जहरी टीका

“उद्धवजी, अजूनही वेळ गेलेली नाही, फडणवीसांना सोबत घेऊन मोदीजींना भेटा”

ममता बॅनर्जींचा भाजपवर सर्जिकल स्ट्राईक; भाजप खासदाराच्या पत्नीचा तृणमूलमध्ये प्रवेश

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या