Top News

लॉकडाऊनसाठी आता राज्यांना केंद्र सरकारची परवानगी आवश्यक!

नवी दिल्ली | देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असेल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या.

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करा. तसेच घरी जाऊन आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशा सूचनाही केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात आल्या आहेत.

कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तर कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावं, असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.

राज्यातील कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करावी, असं केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

“सुप्रिया सुळे मुख्यमंत्री व्हाव्यात, या स्वप्नाच्या आशेने पवारांनी भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय बदलला”

मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली- देवेंद्र फडणवीस

“संजय राऊतांना वाटत असेल तर खुशाल चौकशा करा, जे असेल ते बाहेर येईल”

तुमचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून आम्ही महाराष्ट्रद्रोही काय?- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरे हे प्रशासनासाठी जन्मले नाहीत, ते तर…- चंद्रकांत पाटील

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या