बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

म्हाडाची परिक्षा ऑनलाईन पद्धतीनेच; पेपर फुटीनंतर नवी तारीख जाहीर

मुंबई | म्हाडा (MHADA) पेपर फुटी प्रकरणानंतर राजकीय वर्तुळात चांगलाच गदारोळ पाहायला मिळत आहे. आरोग्य भरती परिक्षेच्या पाठोपाठ म्हाडाचेही पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला तर भाजपनेही या प्रकरणावरून राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.

11 डिसेंबर रोजी म्हाडाची परिक्षा स्थगित करत असल्याची माहिती गृहराज्यमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी दिली होती. सध्या गाजत असलेलं पेपर फुटी प्रकरण समोर आल्यावर आता म्हाडाकडून परिक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली आहे.

म्हाडा सरळसेवा भरती 2021 साठीची परिक्षा आता 1 फेब्रुवारी 2022 ते 15 फेब्रुवारी 2022 यादरम्यान होणार आहे. सदर परिक्षा ऑनलाईन (Online) पद्धतीने होणार आहे. तर परिक्षेचे तपशिलवार वेळापत्रक व अन्य सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावरून लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

दरम्यान, खासगी संस्थांकडून परिक्षा घेतल्या जात असल्याने गोपनीयतेचा भंग होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे आता सर्व परीक्षा म्हाडाच घेणार असल्याची माहिती देखील जितेंद्र आव्हाड यांनी दिली होती.

थोडक्यात बातम्या-

पेपर फुटी प्रकरणी ठाकरे सरकारची मोठी कारवाई; आयुक्त तुकाराम सुपे निलंबित

जिवा शिवाची बैल जोड़! रावसाहेब दानवेंचा पत्नी आणि नातीसह बैलगाडीतून फेरफटका

‘हा’ बहुप्रतिक्षित IPO शेअर बाजारात धडकणार; गुंणतवणूकदांरांंना मोठी संधी

इकडं सुनेची ईडीकडून चौकशी तर संसदेत सासू भाजपवर कडाडल्या

कुत्री-माकडांचं टोळीयुद्ध संपलं! दहशत माजवणारी माकडं अखेर जेरबंद

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More