बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतात आढळला कोरोनाचा नवा घातक व्हेरियंट; रूग्णाच्या शरीरात होतोय ‘हा’ बदल

नवी दिल्ली | कोरोनाच्या प्रादुर्भावानं संपूर्ण देश चिंताग्रस्त होता. राज्यात बऱ्याच ठिकाणी कोरोनाबाधीतांचा आकडा कमी झाल्यानं दिलासा मिळाला आहे. मात्र, आता पुन्हा चिंतेत भर पडली आहे. कोरोना विषाणू सातत्यानं आपलं रूप बदलत असून दिवसेंदिवस तो अधिक घातक होत चालला आहे. गेल्या काही दिवसांपासून याचे नवीन व्हेरियंट समोर येत आहेत. अशात आता भारतात कोरोनाचा आणखी एक नवा आणि घातक व्हेरियंट आढळून आला आहे.

हा व्हेरियंट इतका घातक आहे, की याचा संसर्ग होताच 7 दिवसांच्या आत रुग्णाचं वजन कमी होऊ शकतं. आधी हा व्हेरियंट ब्राझीलमध्ये आढळला होता. तिथून त्याचा एकच व्हेरियंट भारतात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, आता शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की ब्राझीलहून कोरोना विषाणूचे 2 व्हेरियंट भारतात आले आहेत. दुसऱ्या व्हेरियंटचं नाव बी.1.1.28.2 आहे.

शास्त्रज्ञांनी या व्हेरियंटचं परीक्षण एका उंदरावर केलं. याचे परिणाम धक्कादायक होते. परीक्षणातून समोर आलं आहे की, संसर्ग झाल्यानंतर अवघ्या 7 दिवसांच्या आतच याची ओळख करता येऊ शकते. हा इतका भयंकर आहे की, यामुळे फक्त 7 दिवसांत रुग्णाचं वजन कमी होतं. यासोबतच डेल्टा व्हेरियंटसारखा हा सुद्धा शरीरातील अँटीबॉडीजची क्षमता कमी करतो.

दरम्यान, पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी सांगितलं, की बी.1.1.28.2 व्हेरियंट परदेशातून आलेल्या 2 जणांमध्ये आढळला होता. या व्हेरियंटची जीनोम सिक्वेंसिंग करून नंतर परीक्षण करण्यात आलं. कोरोनातून बरं होईपर्यंत दोघांमध्येही लक्षणं नव्हती. मात्र, सॅम्पल सिक्वेंसिंगनंतर बी.1.1.28.2 व्हेरियंट असल्याचं समजताच उंदरावर याचं 7 दिवस परीक्षण केलं गेलं. यातील 3 उंदरांचा मृत्यू शरीराच्या आतील भागात संसर्ग पसरल्यामुळे झाला. सध्यातरी भारतात याची जास्त प्रकरणं नाही. मात्र डेल्टा व्हेरिंयटचे सर्वात जास्त रुग्ण आढळत आहेत.

थोडक्यात बातम्या

हसतं खेळतं कुटुंब कोरोनाने उद्ध्वस्त; सासऱ्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करून घरी येताच पतीचाही मृत्यू

‘…तर कोरोनाची तिसरी लाट अधिक धोकादायक ठरेल’; तज्ज्ञांनी दिला ‘हा’ इशारा

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेची वाईट अवस्था केलीये- अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन

“पंतप्रधान मोदी स्वत:ला फकीर म्हणवतात मग 15 एकरांच्या घराची गरजच काय?”

…अन् संजय दत्त अचानक पोहोचला मंत्री नितीन राऊत यांच्या घरी!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More