“आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय”

संग्रहीत फोटो

नवी दिल्ली |  आम्ही जे वायदे केले होते ते आम्ही पूर्ण केले, भारताच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडतंय, असं वक्तव्य केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे.

राजधानी नवी दिल्ली येथे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचं राष्ट्रीय अधिवेशन चालू आहे. यावेळी नितीन गडकरी बोलत होते.

काळा पैसा आता भारतातून कुणीही परदेशात पाठवू शकत नाही, एवढे कडक कायदे आम्ही करून ठेवलेले आहेत, असंही गडकरी म्हणाले आहेत.

दरम्यान, यावेळी बोलताना गडकरी यांनी गांधी घराण्यावर सडकून टीका केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपच्या युथ ब्रिगेडचा नवा नारा ‘मोदी अगेन’

-विखे पाटलांना मोठा धक्का; निवृत्त आयएएस मेहुण्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

-“भाजपला पूर्ण बहुमत मिळेल आणि नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील”

-आलोक वर्मांनी घेतलेले चार निर्णय CBI नं माघारी घेतले

-“…तर उदयनराजेंनी रिपब्लिकन पक्षातून लोकसभा लढवावी”