बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाच्या नव्या डेल्टा प्लस व्हेरीएंटची लक्षणं नेमकी कोणती? काय काळजी घ्यावी?, वाचा सविस्तर

नवी दिल्ली | भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवल्यानंतर रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आणि आरोग्य यंत्रणेवर मोठया प्रमाणात ताण आल्याचं चित्र पाहायला मिळालं. पण आता रुग्णसंख्या आटोक्यात आली असतानाच भारतात कोरोनाच्या नव्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे.

कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस या व्हेरीएंटचे सध्या भारतात रुग्ण आढळून येत आहेत. देशातील सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंता वाढली आहे. सध्या देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये डेल्टा प्लसचे नवे कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

डेल्टा प्लसची लक्षणं नेमकी कोणती?

  • डेल्टा प्लसच्या रुग्णांमध्ये कोरडा खोकला, ताप आणि थकवा जाणवणे ही सामान्यतः लक्षणं जाणवत आहेत.
  • छातीमध्ये दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे आणि धाप लागणे
  • त्वचेवर पुरळ उठणे, बोटांच्या रंगात बदल होणे ही देखील डेल्टा प्लसची लक्षणे ठरू शकतात.
  • घसा खवखव करणे, डोकं दुखणे, अतिसार आणि चव तसेच वास घेण्याची क्षमता कमी होणे.

अशा प्रकारची बरीचशी लक्षणे डेटा प्लस व्हेरीएंटमध्ये दिसून येत आहेत. पण या विषाणूचा सामना करण्यासाठी नेमकं काय करावं हे आपण पाहूया –

  • साबणाने हात 20 सेकंद स्वच्छ धुणे
  • सामाजिक अंतर पाळून कमीत कमी सहा फुटांचं अंतर ठेवून सार्वजनिक ठिकाणी वावरणे.
  • घराबाहेर पडताना दुहेरी मास्क वापरणे.
  • बाहेरून कोणतंही सामान आणल्यास ते व्यवस्थित धुवून निर्जंतुक करूनच वापरात आणणे.
  • आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणं टाळणे.

अशाप्रकारे आपण डेल्टा प्लस या कोरोनाविषाणूचा सामना करू शकतो व प्रशासनाला सहकार्य करून कोरोना आटोक्यात आणण्यास मदत करू शकतो. डेल्टा प्लस म्हणजेच B.1.617.2 हा विषाणू आहे. सर्वप्रथम हा विषाणू युरोपमध्ये आढळून आला आहे. तसेच सध्या याचे भारतात रुग्ण आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

थोडक्यात बातम्या

शेतकऱ्याच्या 14 वर्षीय लेकीची गगनभरारी, अमेरिकेत केलं यशस्वी विमानउड्डाण

‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’; चक्का जाम आंदोलनावरुन जयंत पाटलांचा सणसणीत टोला

सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, तर चांदीच्या दरात झाली वाढ

पुढच्यावेळी पुणे- मुंबई महामार्ग उखडून टाकू- रविंद्र भेगडे

चिंता वाढली! देशातील नव्या कोरोनाबाधितांचा आकडा 50 हजारांच्या पुढेच

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More