बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता अमेरिकेमध्ये आला नवा रोग, आजारही उपलब्ध नसल्याने चिंता वाढली!

नवी दिल्ली | संपूर्ण जगभरात कोरोना महामारीने थैमान घातलं असतानाच जगभरात मोठ्या प्रमाणात लसीकरणाला वेग आल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यातच अमेरिकेमध्ये लसीचे दोन्ही दोष घेतलेला नागरिकांना सार्वजनिक ठिकाणीही मास्क न वापरण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता अमेरिकेतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.

कोरोनानंतर आता अमेरिकेत नव्या बुरशीजन्य आजाराचे रुग्ण आढळून आल्याने पुन्हा एकदा चिंता वाढली आहे. कँडिडा ऑरिस असं या बुरशीजन्य आजाराचं नाव असून वॉशिंग्टन डीसीमध्ये तसेच डल्लास मध्ये याचे रुग्ण आढळून आले आहेत. या बुरशीजन्य आजारामुळे मृत्यू देखील होण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये या बुरशीजन्य आजाराचे 101 नवे बाधित रुग्ण आढळून आले असून डल्लासमध्ये 22 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. CDC या अमेरिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा बुरशीजन्य आजार संसर्गजन्य असून यावर अजून पर्यंत कोणत्याही प्रकारचे ठोस उपचार उपलब्ध नाहीत.

अमेरिकेतील ज्या नागरिकांना या बुरशीजन्य आजाराची लागण झाली आहे, त्यांना इतरही आजार होते त्यामुळे आता नेमकी कोणाला या आजाराची लागण झाली हे शोधणं मोठं आव्हान असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच या आजराने बाधित झालेल्या रुग्णाला ताप येणे आणि थंडी वाजणे ही प्रामुख्याने लक्षणं आढळून येत आहेत.

थोडक्यात बातम्या –

“अपयशानं खचून न जाता नव्या ऊर्जेने जीवनात यशस्वी कसं व्हावं याचं मीरा आदर्श उदाहरण

“मोदी सरकारमधील बड्या मंत्र्याने मला शिविगाळ केली, मारायलाही धावले”

पाऊस उसंत देणार का?, 5 दिवसांसाठी हवामान विभागाचा नवा अंदाज

पुणेकरांना मोठा दिलासा, ‘या’ नियमाबाबत अजित पवारांचे मोठे संकेत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More