जलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव

तेल अविव | पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्त्रायल दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर जलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना मोदींचं नाव देण्यात आलं आहे. क्रायसंतूमन नावाची ही फुलं ‘मोदी फ्लॉवर्स’ म्हणून ओळखली जातील.

इस्त्रायलच्या सरकारी वाहिनीच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आलीय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सन्मान तसेच भारत-इस्त्रायल यांच्यातील वेगानं वाढणाऱ्या संबंधाचं प्रतिक म्हणून या फुलांची नावं बदलण्यात आली आहेत.

modii 768x1024 - जलद वाढणाऱ्या इस्त्रायली फुलांना पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या