बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गुढीपाडव्याला महाराष्ट्रात नवं सरकार येईल”

मुंबई | महाविकास आघाडीच्या सरकारचं आज खातेवाटप झालं आहे. मात्र या रखडलेल्या खातेवाटपावरून विरोधी पक्षानं टीका करण्याची एकही संधी दवडली नाही. याच पार्श्वभूमीवर येत्या गुढीपाडव्याला महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असं खळबळजनक वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.

मतभेदांमुळे हे सरकार गडगडणार आहे. सत्तेतल्या नेत्यांना जनतेशी काहीही देणं घेणं नाही. गुढी पाडवा हे मराठी नव वर्ष असून त्या दिवशी महाराष्ट्रात नवं सरकार येईल, असं सुधीर मुंनगंटीवार यांनी म्हटलं आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रत्येक निर्णय घेताना चर्चेत प्रचंड वेळ जात आहे. आदेश देऊन काम करायची सवय असलेल्या उद्धव ठाकरेंना याची सवय आता करून घ्यावी लागणार असंही मुंनगंटीवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, मुनगंटीवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळं शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी मधल्या नाराजांना गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपकडून केले जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More