Top News महाराष्ट्र मुंबई

शासकीय कामकाजात मराठीचा वापर न केल्यास बसणार चाप; राज्य शासनाचा मोठा निर्णय

मुंबई | शासकीय कामकाजात आता मराठीचा वापर करणं बंधनकारक असणार आहे. मराठी भाषेचा वापर करण्यात टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेतनवाढ वर्षासाठी रोखण्यात येईल, असा निर्णय मराठी भाषा विभागाकडून घेण्यात आला आहे.

यासंबंधीच परिपत्रक नुकतंच विभागाकडून जाहिर करण्यात आलं आहे. यानुसार लेखी ताकीद देणे, गोपनीय अहवालामध्ये नोंद घेणे, एका वर्षाची वेतनवाढ रोखणे अशा प्रकारची कठोर कारवाई संबंधीत अधिकाऱ्यावर करण्यात येईल, असं नमूद करण्यात आलं आहे.

मराठीचा शासकीय कामात सक्तीचा वापर करण्याचा आदेश जुलै १९८६ मध्येच करण्यात आला. या आदेशाची अंमलबजावणीत मात्र अनेक अडचणी येत होत्या. यासाठी शासनाकडून याबात आता सक्तीची भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, केंद्र सरकारकडून विवीध योजनांची माहिती येते, आता ही माहितीदेखील मराठीमध्ये अनुवादित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठीच्या वापरासाठी शासनानं उचललेलं हे सकारात्मक पाऊल म्हणावं लागेल.

ट्रेंडिंग बातम्या-

पुण्यात कोरोनाचं थैमान, जिल्हाधिकाऱ्यांच्या डॉक्टरांना या महत्त्वाच्या सूचना

जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतून १ लाख २२ हजार कोरोनाबाधितांवर मोफत उपचार, आरोग्यमंत्र्यांचा दावा

महत्वाच्या बातम्या-

59 चिनी अ‍ॅपवर बंदी घातल्याने भारतातील ‘इतके’ हजार कर्मचारी होणार बेरोजगार!

गुड न्यूज! कोरोनावरील पहिली लस भारतात तयार

मुंबईत विनामास्क फिरल्यास भरावा लागणार ‘इतका’ दंड; पालिकेकडून आदेश जारी

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या