बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

ओमिक्राॅन कोरोना व्हेरिएंटबाबत केंद्र सरकारच्या नव्या गाईडलाईन्स जारी

नवी दिल्ली | जगाची चिंता वाढवणारा ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट (Omicron) आढळल्याने केंद्र सरकार सतर्क झाले आहे.  केंद्र सरकाकडून राज्यांना निर्देश देण्यास सुरूवात केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ओमिक्रॉन कोरोना व्हेरिएंट संदर्भात आपत्कालीन बैठक बोलावण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना नविन गाईडलाईन्स असलेले पत्र जारी केले आहे. तसेच आंतराराष्ट्रीय प्रवासाबाबत घ्यावयाच्या खबरदारीबाबतही पत्र जारी करण्यात आले आहे.

केंद्र सरकारच्या आरोग्य सचिवांनी दिलेल्या पत्रात राज्यांना कोरोना चाचणीविषयक सुविधा वाढवण्याचं सांगण्यात आलं आहे. नविन कोरोना विषाणूची कोणतीही लाट आल्यास सुधारीत चाचणी केंद्रे कार्यरत असावी, असं गाईडलाईन्समध्ये म्हटलं आहे.  पायाभूत सुविधा मजबुत करणे आणि मार्गदर्शक तत्वांची कडक अंमलबजावणी करणे, अशा सुचना देण्यात आल्या आहेत.

तसेच ज्या भागात कोरोना केसेस जास्त आहेत, त्या हॉटस्पॉटचे सातत्याने निरीक्षण करावयाचं आहे. सर्व हॉटस्पॉट अधिक कोरोना चाचण्या करून पॉझिटीव्ह नमुने (INSACOG)  तात्काळ जिनोम सिक्वेसिंगसाठी पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोणत्याही हॉटस्पॉटला तात्काळ कंटेंनमेंट झोन म्हणून निर्धारीत करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान, सर्व राज्यांनी टेस्ट, ट्रॅक, ट्रीट आणि लसीकरण या चार सुत्रांची कडक अंमलबजावणी करावी, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे कोरोना नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, असंही सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या-

परळीनंतर आता ‘या’ देवस्थानालाही बॉम्बने उडविण्याची धमकी

भारतीय हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा, चक्रीवादळामुळे महाराष्ट्रातही…

“उद्धव ठाकरे हे अपघाताने झालेले मुख्यमंत्री, केंद्राची कामंही त्यांनी आपल्या खात्यात मांडली”

संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंचा भन्नाट डान्स व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

“पार्टी आणि पबमध्ये भाजप नेते नेमके कुठे असतात हे उद्यापासून काढायला लावू नका”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More