बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नॅशनल क्रश रश्मिका मंधना लवकरच बॉलिवूडमध्ये, उचललं हे मोठं पाऊल

मुंबई |  साउथ सेन्सेशन आणि नॅशनल क्रश रश्मिका मंधना बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी उत्तम कामगिरी करत आहे. मागील काही दिवसांपासून ती आगामी प्रोजेक्ट्करिता मुंबईचा दौरा करताना दिसत आहे. कामामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी रश्मिका मंधनाने आता मुंबईत स्वत:चे एक घर विकत घेतले आहे. मुंबईत सहजतेने काम करता येईल या उद्देशाने तीने हे घर घेतले आहे.

“रश्मिका ‘मिशन मजनू’ आणि बॉलिवूडमधील इतर प्रकल्पांच्या तयारीसाठी मुंबई आणि हैदराबाद दरम्यान धावपळ करताना दिसत आहे. आता तिने शहरात स्वतःचे घर घेतले आहे, जेणेकरुन ती निवात राहू शकते, असे अभिनेत्रीच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले आहे.

“या जागेला अधिक घरगुती भावना देण्यासाठी रश्मिकाने तिच्या हैदराबादच्या घरातून तिच्या मुंबईतल्या नवीन घरात काही जवळच्या आणि प्रिय वस्तू आणल्या आहेत. आधी ती हॉटेल्समध्ये राहिली होती, पण आता ती स्वतःच्या घरात आहे, असं त्यामुळे तिला वाटतं आहे.

रश्मिका मिशन मजनूमध्ये सिद्धार्थ मल्होत्राच्या सोबत दिसणार आहे. हा चित्रपट भारताच्या अत्यंत महत्वाकांक्षी गुप्त कारवाईवर आधारित आहे. वास्तविक घटनांनी प्रेरित आहे आणि 1970 मध्ये सेट केला गेला आहे. तो एका मिशनची कहाणी सांगेल ज्याने भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कायमचे बदलले. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाशिवाय ती आणखी एका प्रोजेक्टमध्ये दिसून येणार आहे. ज्याबद्दल अद्याप माहिती मिळालेली नाही.

थोडक्यात बातम्या

उत्तर द्या ठाकरे सरकार!; पूजा चव्हाण प्रकरणात भाजपनं विचारले ‘हे’ 14 प्रश्न

शेतकरी तसेच सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ऊर्जामंत्र्यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

खेळासाठी कायपण… म्हणून ‘हा’ क्रिकेटपटू म्हणाला विमान नको, मी कारनेच जाणार!

“मी त्यांना वाघ म्हणणार नाही, संत म्हणतो… संत संजय राठोड लगे रहो!”

मजबुरी का नाम उद्धव ठाकरे!; “मंत्र्याची हकालपट्टी करण्यापासून कोण रोखत आहे?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More