तंत्रज्ञान

अॅपलकडून 3 नवीन फोन लाँच; जाणून घ्या किती असणार किंमत…

मुंबई : फोन विश्वातील दादा समजली जाणारी मोबाईल कंपनी म्हणजे अ‌ॅपल. गेल्या महिन्याभरापासून अ‌ॅपलच्या आयफोन 11 चे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आता अखेर आयफोन11 सीरिज लाँच झाली आहे.

जगातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय मोबाईल कंपनी अ‌ॅपल ने मंगळवारी  कॅलिफोर्नियाच्या क्यूपर्टिनो येथे एका इव्हेंटदरम्यान आयफोन 11 सीरिज लाँच केली. या सिरीजदरम्यान, कंपनीने आयफोन 11, आयफोन 11 Pro आणि आयफोन 11 Pro Max हे नवे आयफोन लाँच केले आहेत.

आयफोन 11 ची भारतातील किंमत 64,900 रुपये आहे. यामध्ये 64GB इंटरनल स्टोरेज आहे. तर  11 Pro ची किंमत 99,900 आणि आयफोन 11 Pro Max ची किंमत 1,09,000 आहे.  आयफोन 11 pro मध्ये  128GB इंटनरल स्टोरेज देण्यात आलं आहे.

आयफोन 11 Pro ची किंमत 99,990 रुपये आहे, तर याच्या Max व्हेरिएंटची किंमत 1,09,900 रुपये इतकी आहे. भारतात या नवीन आयफोन साठी 13 सप्टेंबरपासून प्री बुकिंग सुरु होणार आहे. तर 20 सप्टेंबरपासून त्याची डिलीव्हरी सुरु होणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या