न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई!

New India Bank Scam

New India Bank Scam l न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणात आणखी एका आरोपीला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. राजीव रंजन पांडे असं अटकेतील आरोपीचं नाव असून, त्याला झारखंडहून ताब्यात घेण्यात आलं आहे. अटक केल्यानंतर त्याला मुंबईतील किल्ला न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला 28 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या आर्थिक घोटाळ्याचं एकूण आकडेबंद 122 कोटींवर पोहोचलं आहे.

आरबीआयचे निर्बंध आणि खातेदारांची हतबल अवस्था :

या प्रकरणात आतापर्यंत न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेचे माजी सीईओ, महाव्यवस्थापक, विविध व्यापारी, बांधकाम व्यावसायिक आणि कंत्राटदार अशा एकूण आठ जणांना अटक झाली आहे. बँकेत मोठ्या प्रमाणात निधीचा अपहार झाल्याचे समोर आले असून, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या संदर्भात तपास सुरू केल्यानंतरच हा घोटाळा उघडकीस आला.

122 कोटींच्या या घोटाळ्यामुळे न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गंभीर निर्बंध लावले आहेत. बँकेच्या संचालक मंडळाला बरखास्त करण्यात आलं असून, आता प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

New India Bank Scam l पुढील सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी :

या निर्बंधांनुसार पुढील सहा महिन्यांसाठी ठेवी काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे हजारो ठेवीदारांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

बँकेचे अनेक खातेदार आणि ग्राहक सध्या हवालदिल झाले आहेत. आपली आयुष्यभराची पुंजी या बँकेत अडकली असल्याने ते रोज बँकेच्या दारात उभे राहून न्यायाची मागणी करत आहेत. याशिवाय बँकेशी संबंधित अनेक राजकीय कर्जदार असल्याचीही माहिती समोर येत आहे. त्यामुळे हा घोटाळा फक्त आर्थिकच नाही, तर राजकीय पातळीवरही गंभीर आहे.

News Title: New India Cooperative Bank Scam

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .